#Sangmeshwar, #kasaba, #karneshwar,
सप्तेश्वर मंदिर संगमेश्वर | SAPTESHWAR TEMPLE SANGAMESHWAR | Konkan kinare
टीप - स्थानिक लोक मंदिराची स्वच्छता ठेवतात, या मंदिराचा परिसर अतिशय स्वच्छ आणि समृद्ध आहे त्यामुळे कृपया इथं घाण करतात मंदिर पहावे
कोकणात असलेली एक सुंदर प्राचिन जलव्यवस्थापन केलेली देवराई म्हणजे सप्तेश्वर, मुंबई-गोवा हायवेवर चिपळून वरून रत्नागिरीला जाताना शास्त्री नदीवरील पूल ओलांडल्यानंतर डाव्या बाजूला जाताना संगमेश्वरच्या जरा अलीकडे आपल्याला मुळे हॉस्पिटल जवळ एक रास्ता डोंगरावर चढलेला दिसतो हा चढणीचा रस्ता चढल्यानंतर साधारणता चार ते पाच किलोमीटर अंतरावर एका ओढ्याच्या पुलावर या रस्त्याला दोन फाटे फुटतात त्यातील उजवीकडच्या वाटेने आपण सप्तेश्वर महादेवाच्या मंदिराकडे येतो.
घनदाट देवराईत बांधले गेलेले हे महादेवाचे मंदिर भक्कम बांधणीची दिसतं मंदिराच्या शेजारीच एक पाण्याचा प्रवाह वाहताना आपल्याला पाहायला मिळतो. मंदिराच्या आवारात गेल्यानंतर आपल्याला दोन कुंड इथं पाहायला मिळतात या आहेत सप्तेश्वर या देवस्थानाच्या पुष्करणी.
या कुंडांच्या मागे चिर्याच्या बांधकामात बांधलेले सुंदर बांधकाम आपल्याला पाहायला मिळत याच मंदिराच्या परिसरात चून्याच्या घाणीचे दगडी चाक आपल्याला दिसतं.
कोकण परिसरात संगमेश्वरच्या संगमातील नद्यांच्या पैकी एक असलेल्या अलकनंदा नदीचा उगम इथे डोंगरावरच होतो आणि त्यातून झिरपणारे हे पाणी सात प्रवाहात विभागून ते परत एका मोठ्या कुंडात जमा केलं जातं, या सात प्रवाहांचा स्वामी तो म्हणजे सप्तेश्वर. इथल्या स्थापत्य कलेवर इस्लामिक स्थापत्याचा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो. मध्ययुगीन काळात केलेलं हे जलव्यवस्थापन पाहण्यासारखा आहे. सप्तेश्वर शिव मंदिर पश्चिमाभिमुख असून याचा गाभारा मोठा आहे या मंदिराला लागूनच वैजनाथ असाच एक छोटसं मंदिर आपल्याला पाहायला मिळत वैजनाथ म्हणजे खरंतर वैद्यनाथ म्हणजेच इतर वेगवेगळ्या दुर्मिळ औषधी वनस्पती मिळतात असे ठिकाण.
सह्याद्री खंडातील वर्णनाप्रमाणे कसबा संगमेश्वर क्षेत्राच्या आठ दिशांना आठ तीर्थे होती पूर्वेला कमलजा तिर्थ गोष्पद तीर्थ दक्षिणेला अगस्ती तीर्थ (सप्तेश्वर) आग्नेयेला गौतमी तीर्थ नैऋत्येला एकविरा तीर्थ पश्चिमेला वरून तीर्थ वायव्येला गणेश तीर्थ उत्तरेला मल्हारी मय तीर्थ व ईशान्येला गौरी तीर्थ अशी त्यांची नावे आहेत यापैकी गौतमी तीर्थ हे भैरवानी व्यापलेले आहे याठिकाणी स्थान करून ते पाणी जल प्राशन करून मनुष्यप्राणी ब्रह्म लोक आत जातो अशी समजूत होती त्याच प्रमाणे दक्षिणेत डोंगर रांगात वसलेले सप्तेश्वर हे देखील कसबे चे वैभव म्हणावे लागेल, हे क्षेत्र देखील तितकच पवित्र आहे.
कर्णराजाच्या पदरी असलेल्या कविराज शेषाने ‘संगमेश्वर माहात्म्य’ हा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथात तो संगमेश्वर परिसराचे माहात्म्य आणि तिथल्या ठिकाणांचे वर्णन करतो. त्यात त्याने सप्तेश्वराचा उल्लेख केलेला आहे. तसंच परिसरात कोणकोणती देवळे आहेत याचंही वर्णन ‘संगमेश्वर माहात्म्य’मध्ये शेषाने दिलेलं आहे. या ग्रंथात कविराज या स्थानाचे श्रेष्ठत्व वर्णन करतो.
Like, share, Subscribe.. (Kindly protect flora and fauna and do not plucked any kind of flowers, keep environment clear and green, avoid plastic)
KONKAN KINARE
Life in wildlife,
#Umakant Chavan,
#KASBA #KONKAN #RATNAGIRI DARSHAN #kokanvastu #kokanproperty #propertyinkokan #malvanproperty #savekokan #kokan #kokanbeaches #malvan #triptomalvan #vlog #shivajimaharaj #gadkille #jayshivray #kokani #kokanachi_shan #kokanacha_nisarg #kokan_ig #Marathi Youtuber, #SAPTESHWAR, #Marleshwar, #Karneshwar, #KONKAN DARSHAN,
[ Ссылка ] ©lifeinwildlife - umakant chavan
Instagram : umakant_chavan_official
गोव्यातील तांबडी सुर्ला मंदिर | Tambdisurla Temple & Wildlife from Goa [ Ссылка ]
चोर्ला घाट आणि रानफुलांचे पठार | Chorla Ghat - Valley of Flowers [ Ссылка ]
बर्कीचा धबधबा कोल्हापूर | Barki Waterfall Kolhapur | Monsoon Trek of Sahyadri [ Ссылка ]
Ещё видео!