- कीर्तन नमन -
गीतकार: श्री. अनंत वैद्य
संगीतकार व गायक: नारायणबुवा काणे
सद्गुरूनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा
अनसुयेच्या सुता आता तुझाच रे आसरा || धृ ||
विप्र वेश धरुनी गुरु तुम्ही अत्री घरी आला
पतिव्रतेच्या पुण्याईने बाळ तिचे झाला
भक्तासाठी जन्मही तुमचा भक्ता उद्धारा || १ ||
अन्न अल्प परी तुझ्या कृपेने सहस्त्र जन जेवले
मूर्ख ब्राह्मणा भुवनेश्वरीला ज्ञान प्राप्त जाहले
अष्टरुपेही दिपवाळीला दाविली शिष्यवरा || २ ||
वांझेलाही भक्ती बघुनी दिधले संततीला
दुध फोडिले भिक्षेसाठी वृद्धच म्हैशीला
वेल उपटूनी कुंभही दिधला विप्राला गुरुवरा नाथा || ३ ||
कल्पुनी तुमचे रूप वर्णिले साक्ष पटाया जरा
दर्शन द्यावे विनवी अनंता जोडूनी आपुले करा || ४ ||
-- kanebuwa.com --
Ещё видео!