◀️मराठा नौदलांची राजधानी कुलाबा किल्ला▶️
👉कुलाबा किल्ला इतिहास:-
कुलाबा किल्ला किंवा किल्ला-इ-कुलाबा(किल्ले कुलाबा) हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या कोकण प्रदेशात मुबंई शहरापासुन ३५ किलोमीटर दक्षिणेस अलिबागजवळ आहे. हा जलदुर्ग समुद्राच्या किनार्यालगतच पण किनार्यापासुन १ ते २ किलोमीटर अंतरावर, अरबी समुद्रात आहे.हा किल्ला समुद्र सपाटीस समतल आहे. अलिबाग किनार्यावरून १५ मिनिटे चालत किंवा घोडागाडी करून जाऊ शकता सपुर्ण किल्ला २ तासात आरामात फिरुन होतो.
३० ते ३५ किलोमीटर लांबीची अलिबाग तालुक्यातील किनारपट्टी 'अष्टागर' या नावाने ओळखली जाते. या अष्टगराचा राजा म्हणजे 'किल्ले कुलाबा', अलिबागचा पाणकोट. शिवरांयांनी जे जुने किल्ले दुरुस्त करुन मजबूत केले त्यापैकी एक 'किल्ला कुलाबा' प्रथम शिवशाहीनंतर पेशवाई आणि सरते शेवटी इंग्रज असे कालखंड किल्ले कुलाब्याने पाहीले. इंग्रज ज्यांना 'समुद्रावरील शिवाजी' असे संबोधत त्या कान्होजी आंग्रे यांच्या पहिल्या सागरी राजधानीचा मान किल्ले कुलाब्याला मिळाला.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे:-
उजव्या सोंडेचा गणपती मंदीर, हनुमान मंदीर, शिव मंदीर, दर्गा, इतिहासकालीन तोफा, गोड्या पाण्याच्या विहीर तसेच तलाव आणि दारूगोळा ठेवण्याचे ठिकाण
Thank you for watching don't forget to subscribe, like & share
🙏धन्यवाद🙏
Ещё видео!