#BolBhidu #HitendraThakur #VinodTawde
विनोद तावडे, भाजपच्या राष्ट्रीय फळीतले नेते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची लोकसभेची उमेदवारी जाहीर करणारं नाव, भाजपला कित्येक राज्यात यश मिळवून देणारं संघ ते शहा यांच्या जवळचं नाव. मंगळवारी दुपारपासून तेच तावडे अडचणीत सापडल्याच्या बातम्या आहेत. कारण ठरली आहे एक घटना, कारण ठरलं आहे नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर, वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे यांच्यामध्ये झालेला राडा. नालासोपाऱ्यामधल्या विवांता हॉटेलमध्ये तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप क्षितिज ठाकुरांनी केला. त्यांच्याकडे पाच कोटी आहेत, डायरीमध्ये कुणाला किती पैसे दिले याची नोंद आहे, असे आरोप झाले. तावडे यांच्यासोबत असलेले उमेदवार राजन नाईक यांना मारहाण झाली. मोठा राडा झाला, तावडे अडचणीत आल्याच्या बातम्या राज्यभर चर्चेत आल्या. पण या राड्यानंतर तावडे जेव्हा बाहेर पडले, तेव्हा गाड़ी चालवत होते क्षितिज ठाकूर आणि त्याच गाडीत होते हितेंद्र ठाकूर.
ठाकूर यांच्या पक्षाचे फक्त तीन आमदार आहेत,त्यांच्याकडं कुठलं मंत्रीपद नाही, सत्तेत थेट सहभाग नाही. पण त्यांची आयडेंटिटी म्हणजे ताकद. कुणालाही भिडायची आणि कुणालाही नडायची. ज्या तावडेंवर आरोप केले, ज्यांच्या उमेदवाराला आपल्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली, त्याच तावडेंची गाडी अडवून त्यांना आपल्याच गाडीतून बाहेर नेण्याची ताकद. पण हितेंद्र ठाकूर यांच्याकडे ही ताकद आली कुठून ? त्यांचा इतिहास नेमका काय ? त्याचीच ही स्टोरी.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
[ Ссылка ]
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : [ Ссылка ]
➡️ Twitter : [ Ссылка ]
➡️ Instagram : [ Ссылка ]
➡️Website: [ Ссылка ]
Ещё видео!