काल रात्रीच्या सुमारास अनंत करमुसे आणि त्यांचे शेजारी राहणारे सुनील मिल यांच्यात झटापट झाल्यानंतर हा वाद पोलीस ठाण्यात गेला असून दोघांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सुनील मिल यांनी करमुसेनी आपल्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप केला असुन करमुसे यांनी सुनिल मिल यांनी आपल्या घरासमोर येऊन मद्यपान केल्याच्या अवस्थेत शिवीगाळ केल्याचा आरोप केला.याप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी दोघांच्या विरुद्ध एनसी दाखल केली असून सुनील मिल यांनी मद्यप्राशन केल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्याचं म्हंटल आहे.त्याचप्रमाणे रात्रीच्या सुमारास घटनेच्या ठिकाणी पोलीस धावत गेले असता त्यांनाही मिल यांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचं पोलिसांनी म्हंटल आहे.दरम्यान या प्रकरणी करमुसे यांनी यामागे काही राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप केला असून काल घराजवळ येत सुनील मिल यांनी केस मागे घे खूप त्रास देतोय असे बोलत असल्याचा आरोपही केला. सुनील मिल्ल हे मद्यपान करून घराजवळून जात असताना शिवीगाळ केल्याचा आरोप करत करमुसे यांनी केला आहे. तर करमुसे यांची पत्नी या सोसायटीच्या कमिठीवर असून आपल्या घरातील सामान बाहेर ठेवले होते. दरम्यान, या बाबत त्यांना विचारणा करण्यासाठी गेली असता त्यांनी वादविवाद सुरू केली. आणि त्या नंतर अनंत करमुसे आणि त्याच्या भावाने मला बेदम मारहाण केली. त्यात माझ्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याचे सुनील मिल्ल यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून आपली बोळवण केल्याचा आरोप मिल यांनी केला आहे.
BYTE -सुनील मिल,शेजारी
BYTE -राजेशबाबशेट्टी-वपोनी,कासारवडवली
BYTE -अनंत करमुसे,हिंदुत्ववादी कार्यकर्ते
☛ Subscribe now our Youtube Channel:
[ Ссылка ]_...
☛ Visit our Official website:
[ Ссылка ]
☛ Follow Rightnewsonline:
[ Ссылка ]
☛ Like us :
[ Ссылка ]
☛ Send your suggestions/Feedback:
rightnewsonline@gmail.com
☛ Contact Us:
9987891300
#RNO
Ещё видео!