श्री अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र माहात्म्य । Akkalkot Swami Samarth Stotra Mahatmya । सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी श्री स्वामी समर्थ स्तोत्र - महात्म्य । Shri Swami Samarth Stotra Mahatmya
🙏🏻 Everest Bhakti Latest Song - [ Ссылка ]
🙏🏻 Shree Swami Samarth Songs -
♪ Song Available on ♪
WYNK - [ Ссылка ]
Gaana - [ Ссылка ]
Amazon Music - [ Ссылка ]
JioSaavn - [ Ссылка ]
Spotify - [ Ссылка ]
“श्री स्वामी समर्थ”
श्री अक्कलकोट स्वामी समर्थांचे स्तोत्र महात्म्य चे नित्य नियमाने श्रवण-पठण केल्यास आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.
Artist Credits:
Singer: Gayatri Sathe
Music Composed: Paresh Shah (Bombay Paresh)
Lyrics: Traditional
Music Programmed by: Vishal Singh
Recorded by : Kamlesh Sharma ( Line In Studio - Mumbai )
Mix & Master by: Vishal Singh
Video Concept: Kreative Kings
Video Edit & Graphics: Chirag Rajput
श्री अक्कलकोट स्वामी
स्तोत्र माहात्म्य
|| ॐ श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नम: ||
ॐ नमो श्री गजवदना |
गणराया गौरीनंदना |
विघ्नेशा भवभयहरणा |
नमन माझे साष्टांगी || १||
नंतर नमिली श्री सरस्वती |
जगन्माता भगवती |
ब्रम्ह्य कुमारी वीणावती |
विद्यादात्री विश्वाची || २||
नमन तैसे गुरुवर्या |
सुखनिधान सदगुरुराया |
स्मरूनी त्या पवित्र पायां |
चित्तशुध्दी जाहली || ३||
थोर ॠषिमुनी संतजन बुधगण आणि सज्जन |
करुनी तयांसी नमन |
ग्रंथरचना आरंभिली ||४||
श्री अक्कलकोट स्वामीराया स्मरुनी तुमच्या पवित्र पायां |
स्तोत्र महात्म्य तुमचे गावया |
प्रारंभ आता करतो मी || ५||
नांव गांव खुद्द स्वामींचे |
किंवा त्यांच्या मातापित्यांचे |
कोणालाच ठाऊक नाही साचें |
अंदाज मात्र अनेक || ६||
त्यांच्या जन्मासंबंधाने,
आख्यायिका लिहिली एकानें |
तीच सत्य मानुनी प्रत्येकाने |
समाधान मानावे || ७ ||
म्हणे उत्तर भारती एका स्थानी |
घनदाट कर्दळीच्या बनीं |
स्वामी प्रगटले वारुळांतुनी |
लाकुडतोड्याच्या निमित्ताने || ८ ||
कुर्हाडीचा घाव बसून,
त्याचा राहिला कायमचा वण |
आगळी ती अवतार खूण |
प्रत्यक्ष पाहीली सर्वांनी || ९ ||
एका भक्तानें केला प्रश्न,
स्वामी तुमची जात कोण |
तेव्हां दिलें उत्तर छान |
स्वमुखेंच समर्थानी || १० ||
मी यजुवेदी ब्राम्हण |
माझे नांव नृसिंहभान |
काश्यप गोत्र राशी मीन |
ऐसें स्वामी म्हणाले ||११ ||
खरें खोटें देव जाणे |
बरें नाही खोलांत शिरणें |
ईश्ववरी करणीची कारणें |
आपण काय शोधावी || १२ ||
दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण |
नरदेह तरीही केला धारण |
सकळं भूप्रदेश केला पावन |
आपुल्या चरणस्पर्शाने || १३ ||
नंतर स्वामी निघाले तिथून |
तीर्थयात्रेसी केले प्रयाण |
दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण |
प्रत्यक्ष फिरुनी पाहिलें || १४ ||
दत्तवास्तव्य जेथे निरंतर |
तो थोर पर्वत गिरनार |
तेथेच गेले अगोदर |
नंतर फिरले इतरत्र || १५ ||
यात्रेचे प्रवास संपले |
तेव्हा मंगळवेढ्यासी आले |
तेथे थोडे दिवस राहिले |
दामाजीच्या गांवात || १६ ||
काही काळ तिथे गेला |
पुण्यवंतांना प्रभाव कळला |
जनसमुदाय भजनीं लागला |
साक्षात्कारी यतीच्या || १७ ||
पुढे अक्कलकोट हें |
वास्तव्याचे झाले ठिकाण |
अखेरपर्यंत तिथेंच राहून |
अनंत लीला दाखविल्या || १८ ||
तेजःपुंज शरीर गोमटें,
सरळ नासिका कान मोठे |
आजानुबाहू कौपिन छोटे |
दिगंबर असती अनेकदां || १९||
स्वामी समर्थ अक्कलकोटचे |
चवथे अवतार दत्तात्रयाचे |
तीन अवतार यापूर्वीचे |
गुरुचरित्री वर्णिले || २० ||
पहिले दत्तात्रेय, दुसरे श्रीपादवल्लभ |
नृसिंहसरस्वती हे तिसरे नांव शुभ |
गाणगापूर दर्शन देवदुर्लभ |
जागृत दत्तस्थान ते || २१ ||
Ещё видео!