रत्नागिरी पासुन 18 कि.मी. अंतरावर, आणी मुंबई गोवा या महामार्गा जवळ असणारा सुंदर असा हा Niwali Waterfall आहे. पावसाळ्या मध्ये मुंबई गोवा हायवेवरून या Waterfall चे सहज दर्शन होते. या Waterfall च्या खालच्या बाजुला जायचे असल्यास खुप अवघड अश्या डोंगर उतारावरून खाली जावे लागते. या वरील व्हिडिओ मध्ये दिसणा-या Waterfall च्या वरील भागात आपल्या सोबत माहितगार व्यक्ती तसेच आपल्या सोबत सुरक्षिततेची साधन उदा. रोप वैगरे असल्याशीवाय जाणे अत्यंत धोकादायक आहे. Waterfall च्या वरील भाग पावसाळ्यात अत्यंत निसरडा असल्याने पायघसरून खाली पडण्याची दाट शक्यता आहे. Waterfall वरील भागात मोठ्या प्रमाणार पाऊस पडल्यास अचानक मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह देखील वाढू शकतो. परंतु सर्व सुरक्षित गोष्टींचा आभ्यास करून या Waterfall खाली माहितगार व्यक्तीला सोबत घेऊन जाण्याला हरकत नाही.
Waterfall च्या टॉपला जाण्यासाठी गावातुन जंगलातुन वाट आहे. हि वाट चुकण्याचा देखील संभव आहे.
ज्या लोकांना, तरूणांना चित्तथरकारक थ्रिलिंग अनुभव घेण्यात आनंद वाटतो त्यांच्या साठी या Waterfall मधुन दरवर्षी जिद्दी माउंटेनेरिंग या संस्थेतर्फे रॅपलिंगचे आयोजन केले जाते. अनेक तरूण मुल मुली, लहान मुल देखील व वयस्कर मंडळी देखील या Waterfall मधुन खाली उतरण्याचा अनुभव घेतात.
----------------------------------------------------------
Instagram: [ Ссылка ]
----------------------------------------------------------
Song: LAKEY INSPIRED - Chill Day (Vlog No Copyright Music)
Music provided by Vlog No Copyright Music.
Video Link: [ Ссылка ]
#NoCopyrightMusic #VlogMusic #VlogNoCopyrightMusic
Ещё видео!