चोपण जमीन माहिती व उपाय | Chopan Jamin information | Farmer information | Chopan land information
..............................................................................................
#चोपण_जमीन_गुणधर्म👇👇
१) ज्या जमिनीत विनिमययुक्त सोडियमचे प्रमाण १५ टक्के पेक्षा जास्त असते आणि विद्राव्य क्षाराची विदयुत वाहकता ४ डेसी सायमन प्रती मीटर पेक्षा कमी असते व जमिनीचा सामू ८.५ ते १० पर्यंत असतो अशा जमिनीस चोपन जमीन म्हणतात .
२) जमिनीतून पाण्याचा निचरा होत नाही .
३) जमीन ओली असताना चिबड होते आणि जमीन वाळल्यावर टणक होते .
४) चोपण जमिनीत हवा खेळती राहत नाही व त्यामुळे पिकांची वाढ चांगली होत नाही .
..............................................................................................
#चोपण_उपाय_योजना👇👇
१) जमिनीला १ टक्के उतार दयावा .
२) जमिनीखाली सच्छिद्र पाईप टाकून पाण्याचा भूमिगत निचरा करावा .
३) जमिनीतून पाण्याचा निचरा चांगला होण्यासाठी योग्य अंतरावर चर काढावेत .
४) माती परीक्षण करुन जिप्सम , गंधक , आयर्न पायरईट या सारखा भूसुधारकाचा वापर करावा . क्षाराचा निचरा केल्यानंतर अशा जमिनीत शुगरबीट , बार्ली , बरसीम , भात , गहू , ऊस , कापूस या सारखी क्षार सहनशील पिके द्यावीत .
५) सेंद्रिय खतांचा उदा.गांडूळखत , शेणखत , हिरवळीची खते इत्यादींचा वापर वाढवावा .
६) पिकाची फेरपालट करत असताना ताग , धैंचा यासारखी हिरवळीची पिके घ्यावीत .
७) माती परीक्षण करुन खते शिफारशीपेक्षा २५ टक्के वाढवून दयावी .
..............................................................................................
Thanks for watching......#brandशेतकरी🙏🙏
Ещё видео!