#savitribaiphule #marathikavitavachan
पहिली माझी ओवी गं
सावित्रीच्या बुद्धीला
स्त्रियांच्या शिक्षणाचा
पाया तू घातला
अशिक्षित अडाणी तू
पतीपाशी शिकली
मुलींसाठी पहिली
शाळा तू काढली
दुसरी ओवी गायली
तुझ्या गं धैर्याला
दगड गोटे खाऊनी
चालविली तू शाळा
घराबाहेर काढले
गुंडांनी अडविले
धीराने तोंड दिले
सगळ्या गं त्रासाला
तिसरी माझी ओवी गं
तुझ्या मोठ्या मनाला
फसलेल्या विधवेचा
सांभाळ तू केला
अबला नि अनाथांचे
माय बाप होऊनी
यशवंत बाळाला
दत्तक घेतला
चौथी ओवी गायली
तुझ्या थोर हृदयाला
माणुसकीचा झरा ज्यात
नित्य गं वाहिला
ज्योतिबांची सावली
नाही तू राहिली
सत्यधर्म प्रकाशात
तेजानं तळपली
दुःखितांच्या सेवेत
देह तू ठेविला
स्मरण तुझे करुनी
वसा मी घेतला
भगिनींना जागवीन
संघटीत करीन
ज्ञानज्योत लावीन
हेच तुला नमन
Ещё видео!