अमृता यांना बावीस परदेशी भाषा अवगत आहेत' हे एकच वाक्य, खरं तर, अमृता यांचे कर्तृत्व सिद्ध करण्यास पुरेसे आहे. पण तसे करणे अनुचित ठरेल. या प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या अंगी असलेल्या नाना कळा खूप कमी वयात व कमी कालावधीत आत्मसात करणारी दुसरी व्यक्ती खचितच सापडेल. मुंबईत स्वत:ची अॅकेडमी स्थापन करून सुमारे सातशेहून अधिक भारतीयांना विविध भाषांचे प्रशिक्षण देणाऱ्या अमृता परदेशी लोकांना मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत या भाषा शिकवतात.
जपान व युरोप येथे अभ्यास दौरे करणाऱ्या अमृता बहुराष्ट्रीय कंपन्यामधील बड्या अधिकाऱ्यांना परदेशी भाषा आणि संस्कृती यांचे धडे देतात. या क्षेत्रात अध्यापन, अनुवाद, संशोधन अशा विविध विषयांत मुशाफिरी करत असतानाच अमृता यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशन सोहळे परदेशात संपन्न झाले आहेत. बास्केटबॉल, बॅडमिन्टन, मलखांब, जिम्नॅस्टिक्स, अभिनय, जादूचे प्रयोग, सौंदर्यस्पर्धा, काव्यलेखन अशा विविध क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या अमृता, त्यांना अवगत असलेल्या सर्व भाषांमध्ये गाणे म्हणू शकतात. अनेक मानाचे पुरस्कार, परदेश भ्रमण, विविध माध्यमांतून मुलाखती असं सप्तरंगी आयुष्य जगणाऱ्या अमृता आपले सामाजिक भान विसरलेल्या नाहीत, म्हणूनच त्यांच्या कर्तृत्वाला वेगळी झळाळी आहे.
विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !
२०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.
नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'झपूर्झा' प्रस्तुत 'स्वयं टॉक्स मुंबई २०२३'
Connect With Us
Instagram - [ Ссылка ]
Facebook - [ Ссылка ]
Twitter - [ Ссылка ]
LinkedIn - [ Ссылка ]
Subscribe on our Website swayamtalks.org/register/
Download Our App For Free - swayamtalks.page.link/SM23
Google Play Store - [ Ссылка ]
Apple App Store - [ Ссылка ]
Start with your Free Trial Today!
00:00 इंट्रो
01:36 भाषेच्या गमती जमती
04:27 भाषेची देवाण घेवाण
05:55 भाषेमुळे मिळाली रॉयल ट्रीटमेंट
07:15 भाषेकडे बघण्याचा भारतीयांचा दृष्टिकोन
08:15 भाषेतील साम्य
08:57 परदेशी भाषा शिकताना इंग्रजीचा अडसर?
09:30 भाषा शिकण्यासाठी प्राथमिक गोष्टी
10:07 परदेशी भाषांची ओळख कशी करावी
11:01 एवढ्या भाषा येऊनही अनोळखी भाषेतला अडसर
12:40 भाषा शिकण्यामागची प्रेरणा मिळाली तो प्रसंग
14:57 भारतभर जादूचे प्रयोग आणि नाटकात बालकलाकार म्हणून काम
16:01 बालपणी शिकलेल्या अनेक गोष्टीचा करिअरला झालेला फायदा
18:34 मिस इंडिया फायनलिस्ट होण्याचा अनुभव
22:14 भाषा शिकण्याचा आणि शिकवण्याचा प्रवास
24:08 बहुभाषिक होण्याचा मंत्र
24:29 बावीस भाषेतलं गाणं
#Marathiinspiration #SwayamTalks
Ещё видео!