पोटॅशियम शोनाईट हे उत्पादन पोटॅशियम व मॅग्नेशियम या अन्नद्रव्यांचा डबल सॉल्ट आहे. हे खत पाण्यात १०० % विद्राव्य असल्याने जमिनीतून, ड्रीपमधून किंवा फवारणीतून वापरता येते. यात २३% पोटॅश, १०% मॅग्नेशियम व १५% गंधक ही अन्नद्रव्ये आहेत. कोणत्याही पिकाच्या पक्वतेच्या काळात मॅग्नेशियम व पोटॅश या अन्नद्रव्यांची गरज मोठ्या प्रमाणावर लागते कारण पिष्टमय पदार्थ व स्टार्च यांच्या चयापचयाच्या क्रियेत अनुक्रमे मॅग्नेशियम व पोटॅश ही अन्नद्रव्ये भाग घेतात म्हणून त्याचा पुरवठा अपुरा असल्यास फळांची वाढ आणि क्वॉलिटी यांवर विपरित परिणाम दिसून येतात. पक्वतापूर्व स्थितीमध्ये शिफारशीनुसार पोटॅशियम शोनाईटचा जमिनीतून, ड्रीपमधून किंवा फवारणीतून वापर केल्यास फळे व भाजीपाला पिकांमध्ये साखरनिर्मिती व फळांची फुगवण यावर अपेक्षित परिणाम दिसून येतो. पोटॅशमुळे फळे व भाजीपाला पिकांची फुगवण तर होते, पानांचा हिरवा रंग व पर्यायाने त्यांची कार्यक्षमता मॅग्नेशियममुळे अबाधित राहते. पोटॅशियम शोनाईटमध्ये “ पोटॅशियम व मॅग्नेशियम” ही अन्नद्रव्ये असल्याने मुळांच्या कक्षेतील कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी सुधारण्यास व पर्यायाने अन्नद्रव्यांची उपलब्धता व त्यांचे मुळांकडून होणारे शोषण वाढण्यास मदत होते. फळ पिकांसाठी फळवाढीच्या काळात, भाजीपाला पिकांसाठी फळवाढ व तोडयाच्या काळात, ऊस पिकासाठी देत असल्यास लागणीनंतर ६ महिन्यांनी, कांद्यासाठी रोपे लागणीनंतर २ ते २.५ महिन्यांनी, बटाटयासाठी भर देताना व आले-हळदीसाठी पाचव्या महिन्यानंतर वापरावे किंवा या काळात दर १२ ते १५ दिवसांनी २-३ फवारण्या कराव्यात. वापरण्याचे प्रमाण :- जमिनीतून – फळे व भाजीपाला पिकांसाठी फळांचे सेटिंग झाल्यावर एकरी २५ किलो एकदा द्यावे. ड्रीपमधून – फळे व भाजीपाला पिकांच्या पक्वतापूर्व तसेच तोड्याच्या काळात एकरी ३ ते ५ किलो दर आठवडयाला ४ ते ५ वेळा सोडावे. फवारणीतून – ड्रीपची सोय नसल्यास फळे व भाजीपाला पिकांच्या पक्वतापूर्व तसेच तोडयाच्या काळात. स्फुरद युक्त खतामध्ये तसेच कॅल्शिअम व सल्फेट सारख्या खतामध्ये मिसळून फवारणी साठी वापरू नये.
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला शेतकरी पूत्र या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती बद्दलची नवनवीन माहिती, आधुनिक शेती संदर्भातील नवीन तंत्रज्ञान, आपल्या पर्यंत घेऊन येत आहे. आपल्या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत शेतीबद्दलची योग्य माहिती आपल्यापर्यंत पोचवत आहे.
त्यासाठी आपला शेतकरी पुत्र चॅनला सबस्क्राईब करा...
For Business : ganeshgaikwad9011@gmail.com
Ещё видео!