#BolBhidu #satejpatil #KolhapurUttar
कशाला झक मारायला मला तोंडघशी पाडलय, दम नव्हता तर उभाच रहायचं नव्हता ना मगं… मी पण दाखवली असती माझी ताकद… संतापून बोलणारे सतेज उर्फ बंटी पाटील आणि समोर खासदार शाहू महाराजांचे कार्यकर्ते. कोल्हापूरची निवडणूक रंगत नाही असं म्हणणाऱ्यांना आज रंग दिसला. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या, त्यांच्यासोबत स्वत: त्यांचे पती मालोजीराजे आणि सासरे शाहू महाराज होते. सतेज पाटलांच्या समोर अर्ज माघारी घेण्याच्या अर्जावर स्वत: शाहू महाराजांनी सही करण्याचं फर्मान झाडलं, अर्ज माघारीची सही पाहून बंटी पाटील संतापाच्या भरात बाहेर पडले, समोर असणाऱ्या शाहू महाराजांच्या कार्यकर्त्यांकडे बघत जे काही राजकारण झालय ते चांगल केलं नाही मी पण माझी ताकद दाखवली असते अस म्हणतं निघून गेले…
अर्थात कोल्हापूर उत्तरची जागा आत्ता कॉंग्रेस लढवत नाहीय. इथून कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवारानेच माघार घेतलेय. हे नाट्य नेमकं काय झालं, कोल्हापूरच्या राजघराण्यात अस कोणतं नाराजी नाट्य घडलं? दगाबाजी नेमकी कोणी केली आणि आत्ता पुढे काय होणार समजून घेवूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
[ Ссылка ]
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : [ Ссылка ]
➡️ Twitter : [ Ссылка ]
➡️ Instagram : [ Ссылка ]
➡️Website: [ Ссылка ]
Ещё видео!