Pratapgad fort
#pratapgad #pratapgadfort #Beingtravelkar
महाबळेश्वर पासून महाड रस्त्याला २१ कि.मी.अंतरावर प्रतापगड आहे. दि.१० नोव्हे.१६५९ रोजी या किल्ल्यावर छ. शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्यात सर्वात मोठी लढाई झाली होती, त्यामुळे या किल्ल्याला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. सन १६५६ मध्ये शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याची स्थापना केली. समुद्रसपाटीपासून सुमारे ३५४३ फुट उंचीवर हा किल्ला आहे. छ.शिवाजी महाराजांनी’ तुळजा-भवानी’ मातेचे मंदिर या ठिकाणी स्थापले होते. या किल्ल्यावरून कोंकणातील शेकडो किलोमीटर क्षेत्राचे दर्शन घडते.
INSTAGRAM [ Ссылка ]
Ещё видео!