*त्रिभुवनैक सरिता जान्हवी मी पांडुसुता*
आज गंगा दशहरा !
भगवती श्रीगंगेच्या अवतरणाचा दिवस. आजच्याच पावन तिथीला हस्त नक्षत्र, व्यतिपात योग, मंगळवार अशा योगावर माध्यान्ही भगवती श्रीगंगेचे पृथ्वीतलावर अवतरण झाले होते. म्हणून ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून आज दशमी पर्यंत "गंगा दशहरा" महोत्सव साजरा करून, आजच्या दिवशी गंगास्नान करून गंगापूजन करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. गंगा दशहराच्या दहा दिवसांमध्ये गंगेचे स्नान, स्मरण, पूजन, वंदन आणि स्तुती केल्याने; चोरी, हिंसा व परदारागमन ही तीन कायिक (शारीरिक) ; कठोर बोलणे, खोटे बोलणे, चहाड्या करणे व असंबद्ध बडबडणे ही चार वाचिक ; आणि दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा बाळगणे, दुसऱ्याचे अनिष्ट चिंतणे व खोटा अभिनिवेश धरणे ही तीन मानसिक मिळून एकूण दहा प्रकारांची सर्व पापे नष्ट होतात. म्हणूनच श्रीगंगेला *'दश-हरा'* अर्थात् दहा गोष्टी (पापे) हरण करणारी, असेही म्हणतात. तसेच या ज्येष्ठ शुद्ध दशमीलाही त्यामुळे 'दशहरा'च म्हणतात.
भगवती श्रीगंगेच्या स्नान, दर्शन, स्मरण, वंदन, पूजन, तीर्थपान आणि स्तवन या सात प्रकारच्या उपासनेने सुख-समाधान तर लाभतेच; पण दुर्लभ असा मोक्षही प्राप्त होतो.
आजच्या भागात आपण गंगालहरी या संपूर्ण स्तोत्राचे पठण करणार आहोत. संपूर्ण स्तोत्राचे श्रवणही पठणाइतकेच पुण्यदायी ठरते.
आपल्या *स्तोत्र मंत्र अध्याय युट्यूब चॅनलवर* आपण संपूर्ण गंगालहरी स्तोत्र अवश्य ऐका व आपल्या मित्रमैत्रिणींना व परिवारातील सदस्यांना हा मेसेज जरूर फॉरवर्ड करा ही नम्र विनंती 🙏🙏
Ещё видео!