#BolBhidu #NavneetKanwat #SantoshDeshmukh
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे तीव्र असे पडसादं राज्यभर उमटले. पण या हत्या प्रकरणावरून प्रश्नचिन्ह उपस्थित झाले ते बीडच्या कायदा आणि सुवस्थेवर. भर दिवसा एका सरंपंचाचे अपहरण केले जाते आणि त्याची हत्या केली जाते यावरून बीडचा बिहार झालाय काय असे प्रश्न विचारले जाताहेत. यातून धारेवर धरलं जातंय ते बीडच्या पोलिसांना. सरंपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन १४ दिवस म्हणजे दोन आठवडे उलटलेत. तरीपण ७ पैकी केवळ ४ आरोपींना अटक झालीय. या हत्येचे मुख्य सूत्रधारं असा आरोप असणारे वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे अजून फरार असल्याचं सांगितलं जातंय. बीड जिल्ह्यातील पोलिसांच्या या अपयशाला महायुती सरकारलासुद्धा जबाबदार धरलं जातंय. राज्याच्या हिवाळी अधिवेशनातसुद्धा याचे पडसाद उमटले.
त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधीमंडळात २० डिसेंबरला बोलताना बीड पोलिस प्रशासनाने कारवाई करण्यात कुचराई केल्याचं मान्य केलं. त्याचबरोबर त्यांनी बीडचे पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्याचा निर्णय घेतला. आता अविनाश बारगळ यांची जागा आयपीएस अधिकारी नवनीत कवत यांनी घेतलीय. अविनाश बारगळ यांची उचलबांगडी केल्यानंतर अवघ्या चोवीस तासात नवनीत कवत यांची बीडचे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. पण बीडचे नवीन अधीक्षक असणारे नवनीत कावत नेमके आहेत कोण ? त्यांची बीडच्या एसपीपदी नियुक्ती कोणत्या कारणांमुळे झालीय ? त्यांना बीड जिल्ह्यात कुठल्या आव्हांनाना सामोरं जाऊ शकतं ? पाहुयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
[ Ссылка ]
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : [ Ссылка ]
➡️ Twitter : [ Ссылка ]
➡️ Instagram : [ Ссылка ]
➡️Website: [ Ссылка ]
Ещё видео!