दिवाळीतील किल्ले बनवण्याची परंपरा ही आपल्या पूर्वजांनी आपल्या गौरवशाली इतिहासाच्या जवळ जाण्यासाठी निर्माण केलेली एक संधी आहे.. गड, कोट, किल्ला, दुर्ग अशा विविध नामावलीत येणारी ही वास्तू इतिहासकाळी लढाईचे, आक्रमणाचे, संरक्षणाचे, राहण्याचे, वस्तीचे, टेहळणीचे आणि सर्वात महत्त्वाचे राज्यकारभाराचे साधन होते... या एकेका किल्ल्यातून त्या प्रदेशावर सत्ता नियंत्रण आणि त्याचे संरक्षण केले जात, मग अशा या वास्तूला काही विशिष्ट आकार चेहरा हा असणारच...!
याच विचाराने कल्पनेतून किल्ले प्रतिकृती साकारून इतिहास जगवू अशी मनात रूढी भावना ठेवत दुर्गवीर चे शिलेदार रोहित बालडे, स्वप्नील पाडावे यांनी दुर्गराज रायगड ची प्रतिकृती साकारली आहे
•
•
• Follow Us On Instagram~
[ Ссылка ]
Ещё видео!