देहाचा तो देहू | ज्ञानाची आळंदी ||
आलो गे सोडूनी | तुजपाशी ||
अजय गोगावले यांच्या सुरेल आवाजात "पंढरीचे आई" गाणं आलंय.
एव्हरेस्ट मराठीच्या युट्यूब चॅनलवर.
राम कृष्ण हरी 🙏
🎥 Instagram Reels Link - [ Ссылка ]
Everest Entertainment Presents & Anushreefilms Production
Presenting the soulful voice of Ajay Gogavale in Pandhariche Aai
Credits:
Producer : Mayur Shekhar Tatuskar
Singer :- Ajay Gogavale
Music Composed, Arranged, Programmed And Produced by : Padmanabh Gaikwad
Lyrics : Mukund Bhalerao
Rhythm And Percussion Played by : Omkar Ingawale,Nagesh Bhosekar,Apurv Dravid,Nitin Shinde and Ruturaj Raste
Chorus :- Vivek Naik,Rahul Chitnis,Divya Tavde, Veena Joshi.
Additional Chorus : Surabhi Khekale,Vaishnavi Bhuyar,Bandita Bharti.
Ajay Gogavale’s Voice Recorded by : Vijay Dayal @ Yash Raj Studios,Mumbai.
Rhythm And Percussions Recorded by : Vinaayak Pawwar @Soundideaz Studios,Mumbai.
Chorus Recorded By : Ankesh Chandankhede @Ajivasan Studios,Mumbai.
Mixed And Mastered By : Vinaayak Pawwar @Soundideaz Studios,Mumbai.
♪ Song Available on ♪
JioSaavn: [ Ссылка ]
Gaana: [ Ссылка ]
WYNK: [ Ссылка ]
Spotify: [ Ссылка ]
Amazon Music: [ Ссылка ]
Apple Music: [ Ссылка ]
Lyrics:
देहाचा तो देहू । ज्ञानाची आळंदी ॥
आलो गे सोडूनी । तुजपाशी ॥|
पंढरीसी माझे । हक्काचे माहेर ।
सासुर संसार । असाराचा ।
तुझे गे विठाई । नाम येता ओठी ।
व्यथा कोटी कोटी । विसरिल्या ॥
पंढरपूरवासिनी विठाई गे
पंढरपुर वासिनी…
जवळी घे लेकुरा तू आई गे…
पंढरपूरवासिनी..
नांदुनिया शिणलो गे मायेच्या संसारी
चालुनिया दमलो गे ही जन्मांची वारी,
साहे ना साहता
पदरी घे आता…
जन्माजन्मांचा विरह सरू दे…
सरू दे गे आई
मी तू पणाचा भेद हा विरू दे…
भेटी ये लवलाही…
माऊली… पंढरीचे आई…
सावळे रूप साजिरे, विठाई गे
दाविशी लेकुरा जरा...
लागली ओढ मायेची... माऊली गे,
यासाठी आलो माहेरा...
घेवोनी थकलो गे नरदेहाचे उखाणे...
भोगाचे गाऱ्हाणे हे येणे अन् जाणे...
भवपाशाचे उतारे,
तुजपाशी सारे...
मजला जाळिती संसार ज्वाळा...
होते लाही लाही
माथी चंदन अन् तुळशी माळा
दुजे नको काही...
माऊली… पंढरीचे आई…
घेईन... मुख दर्शन...
पाहीन... ती दिव्य दिठी...
सावळ्या.... चैतन्याला
मारीन... कैवल्य मिठी...
तुझ्यातून येवोनी तुझ्यात जाईन...
गर्भात सावळ्या आनंदे राहीन...
नाम तुझे गोड गे मुखाने गाईन...
डोळ्यांनी हजार माये तुला पाहीन...
चिंता ही भवाची ने गे हरोनी..
ये माऊली ये वेगे करोनी...
राही गे माझ्यात माये भरोनी,
जाऊ दे तुझ्यात मज विरोनी...
ना ज्ञाना ना तुकया मी साधा तुझा लेक,
तू मायेचा सिंधु... मी थेंब तुझा एक...
भेटाया जो निघाला...
वाळवंटी आला...
तू अंत आता पाहू नको गे
अंत नको आई....
मज वाळवंटी सोडू नको गे,
भेटी ये लवलाही...
माऊली... पंढरीचे आई..।
#ajaygogavale #vitthal #ashadiekadashi
Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
[ Ссылка ]
Enjoy & Stay connected with us!
YouTube: [ Ссылка ]
Facebook: [ Ссылка ]
Twitter: [ Ссылка ]
Instagram: [ Ссылка ]
Website: [ Ссылка ]
Ещё видео!