१) वनस्पतीचा खजिना असलेल्या संजीवनी बेटावर उत्तर नक्षत्रात यात्रा भरते.
२) यात्रे दरम्यानच्या तीन दिवसात येथील वनस्पतीचे सेवन केल्यावर कोणताही आजार बरा होतो अशी आख्यायिका आहे; त्यामुळे या बेटाला संजीवनी बेट म्हणुन ओळखले जाते.
३) चाकूर तालुक्यातीन वडवळ नागनाथ येथे यात्रा महोत्सव असतो, पव तो व्याधीगस्तांचा या संजीवनी बेटावर उत्तर नक्षत्रात ही यात्रा भरते.
४) हनुमान जेव्हा द्रोणागिरी पर्वत घेऊन उत्तरेकडुन दक्षिणीकडे निघाले होते, तेव्हा या पर्वताचा एक तुकडा हा चाकूर तालुक्यातील या वडवळ नागनाथ येथे पडला होता त्यामुळे या ठिकाणी वेगवेगळा वनस्पती असुन त्याचा उपयोग विविध व्याधीवर केला जातो. त्यामुळे या बेटाला संजीवन बेट म्हणुन संबोधले जात आहे.
५) उत्तर नक्षत्रात या ठिेकाणी विविध व्याधींनी त्रस्त असलेले नागरिक येतात आणि तीन दिवस केवळ वनस्पतीचा सेवन करतात त्यामुळे आजार बरे होतात अशी आख्यायिका आहे.
६) या बेटावर महादेव मंदिर, हनुमान मंदिर एवढेच नाही तर देवीचे मंदिरही आहे.
७) बेटाचे तीन टप्पे आहेत
- सर्वात उंच
- मध्यभागी
- पर्वताचा पायथा
अशा तिन्हीही ठिकाणाच्या वनस्पती चाखल्यास आजार बरा हातो. विशेष म्हणजे या तीन दिवसांच्या काळात जवेण न करता या वनस्पती खाव्या लागतात त्यामुळे कोणत्याही व्यधी दुर होतात असेही सांगितले जाते.
८) बेटावरील माती लालसर रंगाची असुन लोहाचे ३३% प्रमाण आहे, हा भाग समुद्र सपाटीपासुन १,००० फूट उंचीवर असल्याने येथील हा शुध्द असल्याने येथील वनस्पती गुणकारी असल्याचे तज्ञ सांगतात.
९) या संजीवनी बेटावर राजहंस, निर्मळी, रांखपुष्पी, काळी टाकळी आडसुळा, गुळवेल, शतावरी, जटाशंकर अनंतमुळ, सर्पगंधा,सफेद मुसळी, कवच, बीज, कोरफड, रानमिरची, भुईकोहळा, पाचणकंद, मदनकळ, लोखंडी, खडक शेपु यांसह दुर्मीळ वनस्पती आहेत.
१०) महाराषष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून दरपर्षी सप्टेंबर महिन्यात येणारे उत्तर नक्षत्रामध्ये या बेटावर विविध आजाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्ण वैध यांची जत्राच भरलेली असते.
११) औषधी वनस्पती उत्तर नक्षत्र जुलै महिन्यात उगतात.
#best_places_to_visit_in_latur
#Wadwal_Nagnath_Sanjivani_Bet
#SanjivaniBetLatur
#WadwalNagnathBet
#संजीवनी_बेट
Ещё видео!