#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी आपल्या खाजगी आयुष्याची जाहीर कबूली दिली. पत्नीशिवाय माझं करुणा शर्मा या महिलेशी नातं असल्याचं धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर जाहीर केलं. तर हे नातं पती-पत्नीचं आहे की लिव्ह इन रिलेशनशीपचं आहे हे मुंडे यांनी मात्र सांगितलेलं नाही.
कोण आहेत या करुणा शर्मा आणि त्यांचा धनंजय मुंडे यांच्याशी काय संबध आहे? खरंतर हे खाजगी आयुष्यातीलं नातं त्यावेळेस सार्वजनिकरित्या चर्चेला आलं, ज्यावेळेस करुणा शर्मा यांच्या लहान बहिण रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले. त्यानंतर धनंजय मुंडे यांना या खाजगी नात्याविषयी जाहीर कबुली द्यावी लागली.
करुणा शर्मा यांच्यासोबत २००३ पासून धनंजय मुंडे यांचे संबध आहेत. याची संपूर्ण कल्पना त्यांच्या पत्नीला, कुटुंबाला आणि मित्र परिवाराला असल्याचं स्वतः धनंजय मुंडे यांनी सांगितलं. धनंजय मुंडे हे सार्वजनिक आयुष्यात असल्याने मंगळवारी पहिल्यांदाच त्यांनी जाहीररित्या या नात्याची कबूली दिली. करुणा शर्मा यांच्यासोबत आपले परस्पर सहमतीने संबध असल्याचं मुंडे म्हणतात. द्विभार्या प्रतिबंधक कायद्यावरही यानंतर चर्चा झडू लागली.
करुणा शर्मा या मुळच्या इंदौरच्या असल्याची माहिती मिळते. करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांना एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन अपत्यही आहेत. या दोन्ही मुलांचे पालक म्हणून या मुलांना माझं नाव लावण्यात आलं असल्याचं मुंडे यांनी म्हटलंय.
इतकंच नव्हे तर करुणा शर्मा यांचं फेसबुकवर जे अकाऊंट आहे, त्यावर करुणा धनंजय मुंडे असंचं लिहण्यात आलेले आहे. अनेक ठिकाणी करुणा शर्मा आणि रेणू शर्मा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना करुणा धनंजय मुंडे असा हॅशटॅगही वापरलेला आहे.
करुणा शर्मा ही माझ्या मुलांची आई असल्याने त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी मी स्विकारली असल्याचं मुंडे म्हणतात.
करुणा शर्मा यांना मुंबईत घरही घेऊन देण्यात आलं आहे तसेच त्यांच्या भावाला व्यवसायात मुंडे यांनी मदतसुद्धा केली आहे.
करुणा शर्मा यांच्या नावाने असलेल्या फेसबुक अकाऊंटवर धनंजय मुंडे यांच्यासोबतचा एकमेव फोटो आढळून आला. याशिवाय हे अकाऊंट फेक नसल्याचं सांगत त्यांनी नोव्हेंबर २०२०मध्ये मी परळी वैजनाथला येत असल्याचीही एक पोस्ट टाकलेली आहे. करुणा शर्मा यांचा सामाजिक कार्यात सहभाग असल्याचं दर्शवणाऱ्या काही पोस्टही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आहेत.
------------------
[ Ссылка ]
#Tak #MyBillBook
---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Follow us on :
Website: [ Ссылка ]
Facebook: [ Ссылка ]
Instagram: [ Ссылка ]
Twitter: [ Ссылка ]
Ещё видео!