Learn How to Make Poha Chivda With Step By Step. Very Easy Recipe By Gharcha Swaad.
साहित्य - ५०० ग्रॅम पात्तळ पोहे, २००ml तेल, एक वाटी सुक्या खोबऱ्याचे काप, ½ वाटी कच्चे शेंगदाणे, ½ वाटी चण्याच्या डाळ्या, ४० ग्रॅम काजू काप, आपल्या आवडीनुसार दोन प्रकारचे किशमिश, ½ tbl spn जीरे, २ tbl spn धणे, १½ tbl spn बडीशेप, १०/१२ बारीक चिरलेल्या मिरच्या, ½ जुडी कडीपत्ता, ½ tea spn हिंग, २ tbl spn साखर, १½ tbl spn खसखस, १½ tea spn हळद, ३ tea spn पीठी साखर आणि चवीनुसार मीठ.
कृती - प्रथम पोहे ३ दिवस उन्हात वाळवून घ्यावे. वाळवून झाल्यानंतर त्यांना चाळणीतून काढावे. आता एका कढईत कुरकुरीत भाजून घ्यावे. भाजून झाल्यानंतर त्यांना पुन्हा चाळणीतून काढावे. आता ६ tbl spn तेल कढईत घालून तापवावे आणि त्यात कच्चे शेंगदाणे, सुक्या खोबऱ्याचे काप, काजू काप, चण्याच्या डाळ्या सोनेरी रंगावर तळून घ्यावं. आता कढईत एक वाटी तेल घालून चांगलं गरम करून घ्यावं आणि त्यात जिरे, धणे, बडीशेप, चिरलेल्या मिरच्या, कडीपत्ता, हिंग, खसखस, हळद, चवीनुसार मीठ घालून छान परतून फोडणी तयार करावी. आता या फोडणीत भाजलेला पात्तळ पोहा मिक्स करावा. मिक्स करून झाल्यानंतर याला मोठ्या परातीत काढून घ्यावं आणि त्यात तळलेले काजू काप, खोबरे, चण्याच्या डाळ्या, शेंगदाणे, साखर, पीठी साखर ( पीठी साखर चाळून घालावी ), दोन्ही किशमिश घालून चिवडा चांगला एकजीव करून घ्यावा. एकजीव करून झाल्यावर चिवडा हवाबंद डब्ब्यात भरून घ्यावा. हा चिवडा दिड महिनाभर साठवू शकता. धन्यवाद !
Other Diwali Special Recipes -
Maidyachi Chakali | मैदयाची तिखट चकली 👉 [ Ссылка ]
Shankarpali Recipe | तिळाच्या शंकरपाळ्या ( Part 1 ) 👉 [ Ссылка ]
Methi Puri Recipe | मेथीच्या पुऱ्या 👉 [ Ссылка ]
Tikhat Shev | तिखट गाठे 👉 [ Ссылка ]
Champakali Recipe 👉 [ Ссылка ]
Nankhatai Recipe | नानखटाई 👉 [ Ссылка ]
Lachha Puri | कुरकुरीत खाऱ्या पुऱ्या 👉 [ Ссылка ]
Shankarpali Recipe | परफेक्ट शंकरपाळ्या ( Part 2 ) 👉 [ Ссылка ]
Bhajanichi Chakali | भाजणी चकली 👉 [ Ссылка ]
Sajuk Tup | साजूक तूप 👉 [ Ссылка ]
#Pohyachachivda #diwalisnaksrecipe #crispypohachivdainmarathi
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................
Follow Us On Instagram 👉 [ Ссылка ]
Follow Us On Facebook 👉 [ Ссылка ]
For Business Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
Ещё видео!