@jdpaneltravel2022
___________________________________________________________________________________________________
सातारा शहरापासून पुण्याकडे येण्याच्या रस्त्यावर साधारण १२ कि.मी वर लिंब फाटा लागतो आणि तेथून उजवीकडे आत गेल्यावर ३ कि.मी. वर लिंब गाव आहे. ह्या गावाच्या दक्षिणेला २ कि.मी. अंतरावरील शेरीची वाडी या ठिकाणी कृष्णा नदीच्या तीरावर ही बारामोटेची विहीर आहे. पुण्याहून साताऱ्याला येताना आधी लिंब गावाचा फाटा लागतो, तर साताऱ्याकडून जाताना आधी नागेवाडी गावाचा फाटा लागतो. त्यामुळे लिंब आणि नागेवाडी अशा दोन्ही मार्गाने या विहिरीपर्यंत जाता येते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू, म्हणजेच संभाजी महाराजांचे पुत्र, शाहू महाराज ह्यांच्या कारकिर्दीमध्ये हे बांधकाम करण्यात आले. लिंब गावाच्या आसपास सुमारे ३०० झाडांची आमराई होती. ह्या आमराईसाठी आणि परिसरातील रहिवाशांच्या सोयीसाठी ह्या विहिरीची रचना केली गेली.
विहिरीचा व्यास ५० फूट आणि खोली ११० फूट असून आकार अष्टकोनी आणि शिवलिंगाकृती आहे.जमिनीखालील महालात ही विहीर आहे. महालाच्या मुख्य दरवाजावर कलाकुसर केलेली आहे. आतील बाजूस शरभाची दगडी मूर्ती आहे. महालात विविध चित्रे कोरली आहेत. गणपती, हनुमान, कमलपुष्पे अशी अनेक शुभशिल्पे तर दिसतातच मात्र त्यांसोबत विशेष म्हणजे हत्तीवर आणि घोड्यावर विराजमान झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प देखील ह्या खांबावर कोरलेले दिसते. विहिरीला प्रशस्त असा जिना आणि चोरवाटा आहेत. विहिरीवर १५ थारोळी आहेत. ह्या चोरावाटांतून वर आले की १२ मोटांची जागा, दरबाराची आणि सिंहासनाची जागा बघायला मिळते.
___________________________________________________________________________________________________
Gear :
1) Samsung S22 Ultra
2) GoPro Hero8 Black
3) Insta 4k
4) DJI Mavic Mini 2 Drone
___________________________________________________________________________________________________
#बारा_मोटेची_विहीर
#Bara_Motechi_Vihir
#विहिरीत_महाल
#shivaji_maharaj
#sambhaji_maharaj_status
#JD PanelTravel
#jdpaneltravel
#shahu_maharaj
#satara
#history
#historical
#bara_motechi_vihir_limb_satara
________________________________________________________________________________________________
Ещё видео!