#Dhananjaymunde #धनंजयमुंडे #Maharashtra #womens
महाविकास आघाडी सरकारचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे आरोप गंभीर असल्याची प्रतिक्रिया दिली होती. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी धनजंय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राज्यात महिला अत्याचार, महिलांचे हक्क, महिला धोरण अशा विविध विषयांवर सातत्याने बोलणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महिला नेत्या मात्र बलात्काराचा आरोप झालेल्या धनंजय मुंडे यांच्याबाबतीत नि:पक्षपाती भूमिका घेताना दिसल्या नाहीत अशी टीका केली जात आहे.
व्हीडिओ सादरीकरण आणि लेखन - दीपाली जगताप
एडिटींग - राहुल रणसुभे
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
Ещё видео!