#kids #balgeet #children #marathi #marathisong #bedukudya #kidsvideo #kidssong
नवीन कोरं #बालगीत ' अरेच्या ! ' हे धमाल गाणं तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हीही म्हणाल, ' अरेच्या ! ' - Latest Song for Kids on Bedook Udyaa. This fun song will make you sing and dance along.
मुलांना पडणारे प्रश्न मोठे गमतीशीर असतात. आणि अनेकदा ते मोठ्यांनाही पडत नाहीत. पण जेंव्हा मुलं ते प्रश्न विचारतात, तेंव्हा आपण विचारात पडतो आणि म्हणतो 'अरेच्या ! ' हे मलाही सुचलं नाही. असेच मजेशीर प्रश्न विचारेल आमचं हे नवीन गाणं. ऐका, ऐकवा, #like #share #subscribe करा. Enjoy !
गीत: अपूर्व ओक
संगीत : केतन पटवर्धन
संगीत संयोजन आणि ध्वनिमुद्रण : अनिकेत दामले
स्वर: केतकी भावे जोशी
Lyrics - Apurva Oka
Music - Ketan Patwardhan
Music Arrangement, Recording and Mixing - Aniket Damle
Singer - Ketaki Bhave Joshi
Video Background - Vecteezy.com
या गाण्याचे शब्द असे आहेत
गंमत असते अश्शी कशी काही कळत नाही
आमच्या सारखे दिसती तर्री आमच्यासारखे नाही
दूध प्यायच्या कपाला असतो म्हणे कान
टेबलावरच्या फुलदाणीला असते म्हणे मान
फुलदाणीची मान मात्र कधीच फिरत नाही
गुपित सांगतो कानात पण कप काही ऐकत नाही
डोळे असतात म्हणे भाजीतल्या बटाट्याला
शाळेमधल्या गुरुजींसारखी शेंडी नारळाला
शेंडीवाले नारळ गुरुजी शाळा त्यांची नाही
डोळा मारतो बटाट्याला पण तो बघत नाही
टेबलालाही चार पाय प्राणीच की तो काय
पण जागचा हलत नाही याला कारण काय
दोन्ही हात पुढे करून बसते खुर्चीताई
काही केल्या मला मात्र ती टाळी देतच नाही
तेलाच्या बुदलीची चोच दिसते रुबाबदार
मोदकरावांचेही नाक दिसते सुंदर फार
नाकावरती त्यांच्या कधी राग येतच नाही
चोचीमध्ये बुदली काही दाणे वेचत नाही
गंमत अश्शी कशी असते काही कळत नाही
आमच्या सारखे दिसती तर्री आमच्यासारखे नाही
Ещё видео!