" मी तालमीला भरपूर हिरवा रंग घेऊन जातो. झाड कसं कापायचं ते दिग्दर्शक ठरवेल, पण माझ्याकडे खूप रंग असायला हवा! "
- आनंद इंगळे
'झालं एकदाचं', 'माकडाच्या हाती शॅम्पेन', 'सूर्याची पिल्ले', 'लग्नबंबाळ', 'अलीबाबा आणि चाळिशीतले चोर', 'सोळा एके सोळा', 'व्यक्ती आणि वल्ली', 'लव्ह-बर्डस', 'कुसुम मनोहर लेले', 'नऊ कोटी सत्तावन्न लाख', 'आम्ही आणि आमचे बाप' अशी लोकप्रिय नाटकं, अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिका ह्यातील दर्जेदार अभिनयामुळे मराठी रंगभूमीवरील श्रेष्ठ नटांच्या यादीत आनंद इंगळे ह्यांची आज गणना केली जाते.
वयाच्या सतरा-अठराव्या वर्षी 'ग्रिप्स' ह्या कुमारवयीन मुलांच्या भावविश्वावर आधारित नाट्यचळवळीतून आनंद सरांनी अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ३५ वर्षांहूनही अधिक काळ सातत्याने कार्यरत असणाऱ्या आनंद सरांनी केवळ आपलं काम अधिक उत्तम कसं होईल ह्याचंच नव्हे, तर कालानुरूप बदलणारी नाटक लिहिण्याची, बसवण्याची आणि अभिनय शैलीची प्रक्रिया ह्यांचंही भान सजगतेने जपले आहे. म्हणूनच त्यांचं काम नेहेमी चपखल, तजेलदार आणि आधुनिक वाटत असावं.
"प्रवास हा तुम्ही आजवर किती नाटकं केलीत ह्याचा नसतो, तर तुम्हाला किती शिकायचं होतं आणि त्यातलं तुम्ही किती शिकू शकलात त्याचा असतो", असं मानणारे आनंद सर आजच्या भागात सांगताहेत त्यांच्या नाट्यप्रवासाबद्दल आणि ह्या प्रवासात केलेल्या संवाद, आवाज, देहबोली आणि इतर प्रयोगांबद्दल.
Ещё видео!