#puneethrajkumar #Navalebridge #caraccidentlawyer
पुणे-बेंगलुरू हायवेवरच्या नवले ब्रीजवर रविवारी रात्री भीषण अपघात झाला. एक भरधाव ट्रक समोरच्या गाड्यांना धडक देत पुढे गेला. यामध्ये प्राथमिक अंदाजानुसार 30 पेक्षा जास्त गाड्यांचं नुकसान झालं आहे. रविवारी रात्री सव्वाआठ ते साडेआठच्या दरम्यान हा अपघात घडला. यामध्ये 10 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. स्थानिकांच्या साहाय्याने पीएमआरडीए, अग्निशमन दल आणि पोलिसांनी बचाव कार्य केलं. ज्या गाड्यांना धडक बसली त्यातील लोकांना बाहेर काढण्यात आलं. भरधाव ट्रकच्या धडकेत अनेक मोठ्या चारचाकी गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. नवले ब्रीज हा अपघातांचा स्पॉटच मानला जातो. या पुलावर अपघाताची मालिका सुरुच आहे.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
[ Ссылка ]
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
Ещё видео!