#गौतमबुद्ध #प्रेरणादायी #stayinspiredmarathi
◆ About this video...
या व्हिडीओ मध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांचे 50 शांती, प्रेम, सुख, आनंद, प्रेरणा इ. वर प्रेरणादायी विचार मराठीमध्ये सांगितले आहेत. हे सुविचार तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करतील.
___________________________________
● गौतम बुद्धांची माहिती...
■ जन्म :
तथागत गौतम बुद्ध हे भारतीय तत्त्वज्ञ व बौद्ध धर्माचे संस्थापक होते.
शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्नी महाराणी महामाया (मायादेवी) यांच्या पोटी राजकुमाराचा इ.स.पू. ५६३ मध्ये लुंबिनी येथे जन्म झाला.
या राजकुमाराचे नाव "सिद्धार्थ" असे ठेवण्यात आले. सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामाया यांचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमी यांनी केला. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला "गौतम" या नावानेही ओळखले जाते.
■ विवाह :
राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले. यशोधरा या सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा इ.स.पू. ५४७ मध्ये विवाह झाला व पुढे त्यांना राहुल नावाचा एक पुत्र झाला.
■ गृहत्याग :
आपले सुख हा अपवाद आहे आणि जग दुःखात आकंठ बुडालेले आहे हे त्यांना समजले. यांतून मुक्त होण्यासाठी संन्यास हाच अंतिम मार्ग उमजून त्यांनी संसाराचा त्याग करण्याचे ठरविले. २९व्या वर्षी एका पावसाळी रात्री, प्रिय पत्नी यशोधरेचे ओझरते, अंतिम दर्शन घेऊन आणि बाळ राहुलचे मुख हळूच चुंबून सिद्धार्ध राजवाड्याबाहेर निघाला.
■ ज्ञानप्राप्ती :
सर्वसंग परित्याग करून सिद्धार्थाने प्रथम राजगृह येथे जीवनक्रम सुरू केला. एके दिवशी, बोधगया येथे एका पिंपळाच्या वृक्षाखाली बसून त्यांनी अंतिम सत्याची ज्ञानप्राप्ती होईपर्यंत न उठण्याचा निश्चय केला. ४९ दिवसांच्या अखंड अविरत तपस्येनंतर, वयाच्या ३५व्या वर्षी बोधिवृक्षाच्या छायेत अखेर गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली.
ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतमाला सर्वजण ‘बुद्ध’ असे म्हणू लागले. बुद्ध ही व्यक्ती नव्हे ती ज्ञानाची अवस्था आहे. "बुद्ध" म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य. बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली ‘बुद्धत्व’ प्राप्त झाले त्या वृक्षाला "बोधिवृक्ष" (ज्ञानाचा वृक्ष) असे म्हणतात.
■ महापरिनिर्वाण :
कुशीनगर येथे गौतम बुद्धांनी त्यांच्या मृत्यूनंतर परिनिर्वाण प्राप्त केले होते. कुशीनगर, बोधगया, लुंबिनी व सारनाथ ही बौद्ध धर्मामधील चार सर्वात पवित्र स्थाने आहेत. इ.स.पू. ४८३ मध्ये वयाच्या ८० व्या वर्षी तथागत बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले.
___________________________________
● इतर प्रेरणादायी व्हिडीओ :
🎯 चाणक्य यांचे 40 प्रेरणादायी विचार | चाणक्य नीति मराठी | 40 Quotes of Chanakya in Marathi
[ Ссылка ]
___________________________________
🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 60 प्रेरणादायी विचार | 60 Inspiring Thoughts of Dr. B. R. Ambedkar
[ Ссылка ]
____________________________________
🎯 डॉ. ए पि जे अब्दुल कलाम यांचे 40 प्रेरणादायी विचार | 40 Life Changing Quotes of Dr A P J Abdul Kalam
[ Ссылка ]
____________________________________
🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तथ्य आणि दुर्मिळ माहिती | डॉ. बाबासाहेब आंबेडकर | Stay Inspired
[ Ссылка ]
____________________________________
🎯 गौतम बुद्धांचे दहा अमूल्य विचार | 10 Thoughts of Gautam Buddha
[ Ссылка ]
____________________________________
🎯 अल्बर्ट आइन्स्टाइन यांचे 50 प्रेरणादायी विचार | Motivational Quotes of Albert Einstein in Marathi
[ Ссылка ]
____________________________________
🎯 स्वामी विवेकानंद यांचे 40 प्रेरणादायी विचार | 40 Motivational Quotes of Swami Vivekanand in Marathi
[ Ссылка ]
____________________________________
🎯 विश्वास नांगरे पाटील यांचे 50 प्रेरणादायी विचार | IPS Vishwas Nangare Patil Motivational Quotes
[ Ссылка ]
____________________________________
◆ Credit : marathi.popxo.com
____________________________________
● “All the videos, songs, images, and graphics used in the video belong to their respective owners and I or this channel does not claim any right over them."
Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing."
● For Copyright Matter, please Email us - premtayade69@gmail.com
Ещё видео!