#HingoliPolice #FemaleThief #MaharashtraTimes
सोने आणि चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या बुरखाधारी महिलेला व्यवसायिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. या महिलेने हिंगोली शहरातील सराफा बाजारातील एका दुकानात चोरी करायचा प्रयत्न केला. हिंगोली शहरातील सराफा बाजारात एका दुकानात बुरखाधारी महिलेने अत्यंत शिताफीने चोरी करत पलायन केले होते. तेव्हा ती घटना सीसीटीवी मध्ये कैद झाली होती. त्यानंतर हिंगोली शहर पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज पुन्हा तीच महिला त्याच सराफा दुकानात जाऊन त्याच पद्धतीने चोरी करण्यासाठी प्रयत्न करत होती. परंतु यावेळेस ती महिला फसली ती चांदीच्या दागिन्यांची चोरी करत असताना सराफा व्यवसायिकांनी रंगेहात पकडले आहे.
Ещё видео!