किल्ले रायगडवरील वाघ दरवाजाच्या जतन आणि संवर्धन कामास रायगड विकास प्राधिकरणाने प्रारंभ केला आहे. मंगळवारी रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी पाहणी केली आणि या कामाबाबत महत्वाच्या सूचनाही केल्या.
किल्ले रायगडवरील वाघ दरवाजा हा लष्करी वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमूना म्हणून ओळखला जातो. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर मुघल सैन्याने किल्ले रायगडला वेढा दिला. स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज, ताराबाई राणीसाहेब आणि त्यांचे सहकारी या वेढ्यामुळे गडावरच अडकून पडले होते. याच वाघ दरवाजामार्गे ते आपल्या निवडक सहकार्यांसह गडावरुन निसटले होते. त्यामुळे शिवकालीन इतिहासात या वाघ दरवाजाला अनन्यसाधारण असे महत्व आहे.
Ещё видео!