Please watch: "मूर्ख सेवक | Murkh Sevak | Marathi Goshti | Marathi Cartoon | Marathi Story"
[ Ссылка ] --~--
Landga Ala Re Ala (लांडगा आला रे आला) is a Marathi Story For Children, Chan Chan Marathi Goshti which you and your Kids will love watching it.
एका गावात एक धनगर होता. त्याचा मुलगा रोज आपल्या मेंढया घेऊन गावाबाहेर चरायला घेऊन जात असे. संध्याकाळ झाली की परत आणत असे.
त्याचा हा रोजचा दिनक्रम होता. तो जेथे मेंढ्या चरायला घेऊन जाई तेथे शेती होती. अनेक गावकरी तेथे दिवसभर काम करत असत.
एकदा तो असाच मेंढ्यांना घेऊन चरायला गेला होता. दुपार झाली. त्याने जेवण केले. पण नंतर त्याला फार कंटाळा येऊ लागला. काहीतरी गंमत करायची असे त्याने ठरवले. तो जोरात ओरडला, 'लांडगा आला रे आला.'
लोकांना खरे वाटले. ते शेतातली आपली कामे सोडून काठ्या घेऊन धावत त्याच्याजवळ आले. त्याला विचारू लागले, 'कुठे आला लांडगा'. तेव्हा तो मोठ्याने हसू लागला व म्हणाला 'कशी गंमत केली.'
शेतकरी संतापले. पण करतात काय तसेच निघून गेले. त्याला मात्र यात गंमत वाटली. दुसर्या दिवशी त्याने पुन्हा हाच उद्योग केला. शेतकर्यांना उगाचच एक हेलपाटा पडला. पुन्हा कसे फसवले म्हणून तो हसू लागला. शेतकरी संतापून निघून गेले.
तिसर्या दिवशी तो पुन्हा मेंढ्या चरायला घेऊन आला. दुपार झाली आणि तो जेवायला बसला. पण त्या दिवशी खरेच एक लांडगा तेथे आला आणि एका मेंढीवर ताव मारू लागला.
तो जोरजोरात ओरडू लागला 'लांडगा आला रे आला.' पण आजूबाजूच्या लोकांनी त्याला अजिबात भीक घातली नाही. तो नेहमीसारखीच थट्टा करतोय, असे वाटून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
लांडग्याने एक एक करत सर्व मेंढ्या खाल्ल्या. तो रडू लागला. पण आता काहीच उपयोग नव्हता. त्याला आपली चूक लक्षात आली. पण आता फार उशीर झाला होता.
उपदेश: थट्टा उडविणे केव्हाही वाईटच.
#ryankidsclub #moralstories #StoriesforKids
****************************************************************
Moral Stories for Kids
****************************************************************
===============================================
Video: Copyright 2017 Home Revise®
Music and Lyrics: Copyright 2017 Home Revise®
Ryan Kids Club®, all the characters and logos
used are the registered trademarks of Home Revise
===============================================
Category : Education
License : Standard YouTube License
Ещё видео!