नमस्कार,
समस्त कोल्हापूरकर शाहू प्रेमी नागरिक हो..
आज एक महत्वपूर्ण विषय घेऊन आपल्या समोर येत आहोत तरी जास्तीत जास्त कोल्हापूर जिल्ह्यातील नेते मंडळी,अभ्यासक,अधिकारी,सामाजिक कार्यकर्ते,सर्व नागरिक व विशेषतः पूरग्रस्त नागरिक यांनी आप आपली मते मांडावी अशी आमची इच्छा आहे..
नुकताच महापूर येऊन गेला पण धरण न भरताच महापूर आला कदाचित राधानगरी धरणाचे दरवाजे या काळात उघडले असते तर अजून भयानक परिस्थिती अनुभवावी लागली असती असे अनेक लोकांचे मत आहे. कालच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेबांच्या दौऱ्यात पण राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजे बदलण्याचा विषय ऐरनी वर आला.पण हे धरण शाहूकालीन असलेमुळे हे ऐतिहासिक दरवाजे बदलू नये असे काही लोकांना वाटते तर काही लोक राजर्षी शाहू नी सातत्याने आपल्या रयते साठी नाविन्याची कास धरली म्हणून धरणाचे जुने दरवाजे बदलून नवीन दरवाजे बसवले पाहिजे अशी मागणी केली आहे...
एक कोल्हापूरकर म्हणून आपलेला काय वाटत हे आपण नक्की आम्हाला कळवा... आपल्या भावना शासनापर्यंत पोहचवण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू... पण आता आपलेला या विषयावर बोलावे लागेल, आपले मत मांडावे लागेल ...
धन्यवाद..
बायसन नेचर क्लब राधानगरी
#बायसन नेचर क्लब राधानगरी
Ещё видео!