खूप वर्षांपूर्वी जग्गनाथ रत्नपारखी यांची ही कविता माझ्या वाचनात आली होती. अलीकडेच एका कार्यक्रमात ती मी सादर केली. त्याचा विडिओ तुमच्यासोबत share करत आहे.
S.S.C.स मी बसलो होतो प्रथम परीक्षेस,
एकाग्रतेने पेपर सोडवा आदेश.. उपदेश
पेपर पहिला, घंटा पहिली, क्षण हा औत्सुक्याचा,
अन माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा.
मानेला ती देऊनी हिसडा नकळत सवयीने,
लिहू लागली पेपर तेव्हा पानांवर पाने.
मऊ रेशमी मोहक काळा, शेपट्याचा भार
तिचा तत्क्षणी येउनी पडला माझ्या बाकावर,
तीन तास एक चित्त मी तिच्या शेपट्यात
एक ही ओळ लिहिली नाही उभ्या पेपरात
शेवटची ती घंटा होता, आलो भानावरं
कळले आता जगणे आम्हा गावी खेडयावरं.
केसांनी त्या गळा कापला अलगदची माझा,
पिळीत शेपट्या परी बैलाच्या जगतो हा राजा
शेतावरच्या मोटेवरती माझी उपजीविका,
शिक्षणास आज मी पारखा, शुभदा प्राध्यापिका !!
#SpruhaJoshi #Marathi #Kavita
Follow for regular updates on
Facebook : [ Ссылка ]
Twitter : [ Ссылка ]
Instagram : [ Ссылка ]
Ещё видео!