मानगड (Mangad )
रायगडावर उत्तरेने हल्ला होउ नये म्हणून वायव्य दिशेला मानगड मजबुत केला. याच बाजुने सुरत, मुंबईकडून येणारी वाट.
.
मिर्झाराजे जयसिंगाच्या स्वारीनंतर शिवाजी महाराजांना राजधानीच्या दुर्गाची जागा बदलण्याची आवश्यकता वाटली. राजगडावरुन राजधानी रायगडावर हलवली गेली. पण यामध्ये राजधानीच्या मुख्य गडाला भक्कम संरक्षण आवश्यक होते. यासाठी निसर्गाने पुरवलेल्या सुरक्षेबरोबरच मानवनिर्मीत दुर्गांच्या चिलखताची आवश्यकता होती. रायगडाभोवती आधीच काही दुर्ग उभारलेले होते. यात चांभारगड, सोनगड हे दुर्ग होतेच. पण आणखी एक प्राचीन दुर्ग रायगडाच्या घेर्यात होता. तो मानगड
.
नागोठणे-पाली-कोलाड अशी पाचाड व पुढे रायगडाकडे जात होती. मोंघल व इंग्रज या स्वराज्याच्या दोन शत्रुंचा रायगडाकडे जाण्याचा मार्ग हाच असल्याने मानगडाला सहाजिकच महत्व प्राप्त झाले होते. मानगड संदर्भातील महत्वाची बाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांच्या यादीत याचा उल्लेख आहे. महाराजांच्या काळात मानगड पुनर्बांधणी करून अधिक मजबूत; करण्यात आला.
.
शिवपूर्व काळात देखील कोकण आणि दख्खन यांना जोडणाऱ्या सह्याद्रीतील घाट-वाटा प्रचलित होत्या. या घाट-वाटांना सरंक्षण देणे आणि त्या मोबदल्यात जकात वसूल करणे हि त्या काळातील परंपरा होती आणि हे काम या मार्गांवरील हे किल्ले करीत असत. मार्गांचे रक्षण करण्यासाठी गडावर सैन्य ठेवणे आणि व्यापाऱ्यांकडून मिळालेली जकात आणि परिसराची धारा वसुली सुरक्षितपणे गडावर ठेवणे असे दुहेरी काम या किल्ल्यांवर होत असे.
.
कोकणातील निजामपूर-बोरवाडी-मांजुर्णे - कुंभे-घोळमार्गे घाटावरील पानशेत या व्यापारी मार्गाचे रक्षण मानगड करत होता.मानगडची निर्मिती ही राजधानीचा उपदुर्ग म्हणूनच झाली असली तरी गडावरील खोदीव टाक्या त्याच्या प्राचीनतेची साक्ष देतात. सह्याद्रीच्या अजस्र डोंगररांगेला चिकटून एखाद्या टेकडीसारखा असलेला हा मानगड आईचे बोट धरुन उभा असलेल्या मुलासारखा दिसतो.
#मानगड
#mangadfort #रायगड #raigad #nagartrekkers #fortsofmaharashtra #kokandiva
Ещё видео!