Spicy Crab Curry | Pure Homemade And Authentic Style.
साहित्य - ६/७ खेकडे, १०० ग्रॅम भाजलेले सुके खोबरे, ३ हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर, १५ लसूण पाकळ्या, २" आले, २० ग्रॅम भाजलेले चणे, ३ कांदे भाजलेले, ६ tblspn तेल, २½ tblsp घरगुती मसाला, १ tea spn हळद, १ tblspn घरगुती गरम मसाला, ५/६ कोकम पाकळ्या आणि चवीनुसार मीठ.
कृती - सर्वप्रथम खेकडे साफ करून घ्यावेत आणि त्यांचे फांगडे ठेचून घ्यावेत. खेकड्यांच्या नांग्या मिक्सरला वाटून त्याचा अर्क तयार करून घ्यावा. नंतर भाजलेले सुके खोबरे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण पाकळ्या, आले, ग्रॅम भाजलेले चणे आणि भाजलेले कांदे यांचे बारीक वाटण तयार करून घ्यावे. आता एका भांड्यात तेल गरम करून त्यात तयार वाटण घालून परतून घ्यावे. परतून झाल्यावर त्यात घरगुती मसाला, हळद, गरम मसाला घालून वाटनातून तेल सुटे पर्यंत परतून घ्यावे. वाटनातून तेल सुटल्यावर त्यात खेकडे टाकावे आणि मसाल्यात चांगले घोळून घ्यावे. आता यात रस्स्यासाठी पाणी घालावे. पुन्हा सर्व मिश्रण चांगले घोळून घ्यावे. आता खेकड्याच्या कालवणाला १० मिनिटे उकळून घ्या. १० मिनिटानंतर यात तयार खेकड्याच्या अर्क घाला. ( अक्ख्या नांग्या घेतल्या तरी चालतील. ) चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. मिश्रण पुन्हा एकजीव करा आणि शेवटची १० मिनिटे चांगली उकळी घ्या. तयार खेकड्याचे कालवण गरमागरम भाकरी किंवा भाता सोबत वाढा. धन्यवाद !
Ещё видео!