पहिलं महायुद्ध संपल्याला 11 नोव्हेंबरला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या महायुद्धात 13 लाख भारतीय सैनिक सहभागी झाले होते. यातल्या 75 हजार भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला.
शौर्य, निष्ठा असलेल्या भारतीयांना ब्रिटीशांनी सैन्यात भरती करून घेतलं. या सैनिकांनी युरोप, आफ्रिका इथल्या सगळ्याच युद्धभूमींवर या सैनिकांनी आपलं बलिदान दिलं. भारतीय सैनिकांनी ब्रिटीशांना मदत केल्याबद्दल भारताला राजकीय स्वायत्तता ते देतील अशी आशा भारतीयांना होती. मात्र, तसं न झाल्यानं भारतात स्वातंत्र्याच्या मागणीला सुरुवात झाली. होमरूल चळवळ, स्वराज्य चळवळीला पहिल्या महायुद्धानंतरच सुरुवात झाल्याचा दावा काही माजी सैन्य अधिकाऱ्यांनी बीबीसीकडे बोलताना केला.
#WW1 #IndianSoldiers
_
अधिक माहितीसाठी :
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
Ещё видео!