श्री दत्त कृपा प्रासादिक भजन मंडळ ( नारिंग्रे - देवगड )
बुवा : सुहास घाडी
आणि मंडळी
Lyrics :
ह्यो यशोदेचो कार्टो, लय भारी वटवटो
गौळण निघे साध्या भोळ्या मनाची
यशोदे माई इल्या गेल्याची, ह्येका द्रुष्ट लागली काय कुणाची ।।धृ ।।
ह्यो दुडू दुडू चलता, धरून धरून उभो रव्हता
माझ्या शिक्या पर्यंत ह्येचो हात कसो पुरता
मीया येय तागत, सगळा खाऊनच रव्हता
माका बघून हात लपवी पाठीशी
यशोदे माई इल्या गेल्याची, ह्येका द्रुष्ट लागली काय कुणाची ।।१।।
बोबड्या बोलात ह्यो, नको नको ता ह्यो बोलता
ह्येचि भाषा डोक्यात, घुसता घुसतच नसता
कालचा आज मका सांगता, आजचा उद्या बोलान म्हनता
रागे भरता म्हणान, केलंय मस्करी
यशोदे माई इल्या गेल्याची, ह्येका द्रुष्ट लागली काय कुणाची ।।२।।
इल्या इल्या माझ्या ह्यो, नुसतो पाठीशी लागता
घरचा धय सरवता, वर माझ्याकडे मागता
अगे यशोदे माता, झिलाक आवर घाल गे आता
श्रीधर तुझो खोडी काढता दुसऱ्याची
यशोदे माई इल्या गेल्याची, ह्येका द्रुष्ट लागली काय कुणाची ।।३।।
Follow me on...
* Facebook
- [ Ссылка ]
* Instagram
- [ Ссылка ]...
All Copyrights Are Reserved By GHADI PHOTOGRAPHY
Ещё видео!