अनुसूचित जमात प्रमाणपत्र समिती कार्यालयाचे सहआयुक्त विनोद पाटील यांचा नूतनीकरणासाठी पुढाकार
शासकीय नोकरीत अनेक वर्ष अव्याहतपणे परिश्रम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयाचे वातावरण, सोयीसुविधा उत्तम असणे आवश्यक आहे असे नागपूरच्या अनुसुचित जमात प्रमाणपत्र तपासणी समितीचे सहआयुक्त विनोद पाटील मानतात. त्यांच्या या भावनेतून डिसेंबर २०१८ मध्ये नागपूरच्या अनुसुचित जमात प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयाच्या नूतनीकरणाला सुरुवात झाली आणि आज सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या या कार्यालयातील शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये एखाद्या कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत असल्याची भावना आहे. सीसीटीव्ही आणि इंटरकॉम सुविधा, स्वतंत्र वर्कस्टेशन्स, नोंद ठेवण्यासाठी पूर्णतः संगणकीकरण व्यवस्था, पुरातन संग्रहासाठी ग्रंथालय, वॉटर प्युरिफायर्स अशा अत्याधुनिक पायाभूत सुविधांनी परिपूर्ण असलेले कार्यालय भविष्यात कोणत्याही शासकीय कार्यालयासाठी एक आदर्श उदाहरण ठरू शकते.
#कार्यालय #सोईसुविधा #संगणकीकरण #ग्रंथालय #आदिवासी #आदिवासीविकासविभाग
#CasteScrutinyCommittee #CasteScrutinyCertificate #Infrastructure #Computerization #IntercomFacilities #EthnographicLibrary #Internet #Nagpur #TribalCommunities #TribalDevelopmentDepartment
Ref Link:-
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
Ещё видео!