ऊर्जेने ओसंडणाऱ्या, चैतन्यमय, अस्वस्थ आणि विस्फोटक अशा काही अणूंना एकत्र बांधून त्यांना मूर्तीरूप दिलं तर जे विलक्षण रसायन तयार होईल ते म्हणजे अविनाश नारकर !
'काळोखाच्या सावल्या', 'तक्षकयाग', 'गंध निशिगंधाचा', 'रणांगण', 'प्रेमपत्र', 'तीन पैशाचा तमाशा', 'ती फुलराणी', 'राहिले दूर घर माझे', 'सोयरे सकळ' अशा ३५ होऊन अधिक नाटकांतील संस्मरणीय भूमिकांमुळे मराठी रंगभूमीवरील श्रेष्ठ नटांच्या यादीत गणले जाणारे अविनाश नारकर हे गेली ३० वर्षं अभिनयक्षेत्रात कार्यरत आहेत.
इतक्या वर्षांचा अनुभव असूनही आग्रहाने स्वतःला कायम विद्यार्थीदशेत ठेवणे, कोणतीही व्यक्तिरेखा आत्मसात करण्यासाठी सखोल अभ्यास आणि कसून मेहनत करणे, आणि प्रत्येक प्रयोग हा आयुष्यातला पहिला किंवा शेवटचा असल्यासारखं जीव ओतून भूमिका सादर करणे ह्या अंगभूत गुणांमुळे अविदादा बनचुक्या नटांच्या गर्दीत वेगळे, उठून दिसतात.
आपली अभिनय प्रक्रिया विषद करताना भूमिकेची तयारी, संवाद, आवाजाचा परिणामकारण वापर, देहबोली अशा अनेक विषयांवर अविदादा बोलताहेत रंगपंढरीच्या ह्या भागात.
Ещё видео!