"विचार करायला लावणारी, डोळ्यात पाणी आणणारी, हसवणारी नाटकं मला आवडतात. पण माझं नाटक ह्या सगळ्यापेक्षा वेगळं, spectacular आणि प्रेक्षकांना अचंबित करणारं असावं असा माझा नेहमी प्रयत्न असतो."
- केदार शिंदे
अतर्क्य आणि वेगवान कथासूत्रं, अवाक करणारी दृश्यं, सळसळत्या ऊर्जेने भरलेल्या हालचाली आणि खळखळून हसवणारा प्रसंगनिष्ठ विनोद ही गुणवैशिष्टयं असलेली नाटकं लिहिणारे आणि दिग्दर्शित करणारे प्रसिद्ध रंगकर्मी केदार शिंदे ह्यांना आपण आजच्या भागात भेटणार आहोत.
प्रयोगसंख्या आणि लोकप्रियतेचे अनेक उच्चांक मोडणाऱ्या 'सही रे सही', 'श्रीमंत दामोदरपंत', 'तू तू मी मी', 'लोच्या झाला रे', 'गेला उडत', 'मनोमनी' अशा अनेक कलाकृती केदार सर गेली पंचवीस वर्षं रंगभूमीवर सादर करत आले आहेत.
सरधोपट आणि सादर करायला सहजशक्य संहितांपेक्षा पाश्चात्य देशातील नाटकांसारखी कल्पक, भव्य आणि नेत्रदीपक मांडणी आपल्या नाटकात करून प्रेक्षकांना थक्क करणारा अनुभव द्यावा यासाठी केदार सर स्वतः जीव तोडून मेहनत करतात. आणि नटांकडून करून घेतात.
अशी अनवट, महत्वाकांक्षी आणि रसरशीत नाटकं उभी करायची दिग्दर्शन प्रक्रिया कशी असते ते ऐकूया केदार सरांकडून.
Ещё видео!