राज्यमंत्री आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांचा एक शिवीगाळ करणारा व्हीडिओ समोर आलाय.
या व्हीडिओमध्ये रवींद्र चव्हाण भर रस्त्यात फोनवर कुणाला तरी शिवीगाळ करतायत. जवळपास महिनाभरापूर्वीचा हा व्हीडिओ असल्याचं कळतंय. हा फोन त्यांनी कुणाला केलेला आणि शिवीगाळ कुणाला केली हे अद्याप कळू शकलेलं नाही.
दरम्यान रवींद्र चव्हाण याआधीही डोंबिवलीच्या फेरीवाल्यांना शिवीगाळ करताना कॅमेऱ्यात कैद झालेत.
Ещё видео!