पुणे, दि.२९ (चेकमेट टाईम्स): पुण्यातील लाल महालातील दादोजी कोंडदेव पुतळा असेल की, संभाजी बागेतील गडकरी यांचा पुतळा असो, किंवा शहरातील इतर काही महापुरुषांचे पुतळे, त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांसह सामाजिक संघटनांची आंदोलन, मागण्या सुरूच असतात, असेच एक आंदोलन आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले असून, कोथरूड मधील कर्वे पुतळा स्मारकाचे काम रखडल्याच्या विरोधात कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन तुपे नगरसेविका लक्ष्मी दुधाने, कोथरूड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने, बापू डाकले यांच्या नेतुत्वाखाली सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचा जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी सत्ताधारी भाजपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
कर्वे रस्त्यावरील याच कर्वे पुतळ्याची २०११ मध्ये देखील अशीच फरफट तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांनी केलेली होती. रस्त्याच्या मध्ये सर्कल मध्ये असलेला कर्वेंचा पुतळा हलवून, रस्त्याच्या कडेला स्मारक बांधून त्यावर २०१० मध्ये पुतळा स्थापन करण्यात आला होता. मात्र २०११ संपत आले तरी त्या पुतळ्यावर सदरील पुतळा कोणाचा याची अक्षरे टाकण्यात आली नव्हती. त्यामुळे हा पुतळा कोणाचा असा संभ्रम निर्माण होत होता. याबाबत वंदे मातरम अभिनव संघटना या सामाजिक संस्थेने मनपाशी पत्रव्यवहार करूनही नाव टाकण्यात न आल्याने, शेवटी ५ सप्टेंबर २०११ रोजी संघटनेने स्वखर्चातून पुतळ्याच्या स्मारकावर नावे कोरण्यात आली होती.
follow us on facebook : [ Ссылка ]
follow us on twitter : [ Ссылка ]
#CHECKMATETIMES
#checkmatetimes
#CheckmateTimes
#चेकमेट_टाईम्स
