#BolBhidu #VasantraoDeshmukh #JayashtreeThorat
वसंतराव देशमुख, मागच्या तीन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आलेलं नवं नाव. तीन दिवस मागे गेलं तर वसंत देशमुख राज्यात फारसे कुणाला माहीत नव्हते. पण आता ते चर्चेत आलेत, एका वक्तव्यामुळं, त्यांनी बाळासाहेब थोरातांच्या कन्या आणि युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलंय. माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या व्यासपीठावरूनच त्यांनी हे वक्तव्य केल्यानं संगमनेर विधानसभा मतदारसंघातलं राजकीय वातावरण तापलंय. थोरात विरुद्ध विखे संघर्षाला नवं वळण मिळालंय. जयश्री थोरातांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यापासून वसंतराव देशमुख फरार होते. दोन दिवसांपासून पोलीस त्यांचा शोध घेत होते.
पण त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता. अखेर संगमनेर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं वसंतराव देशमुख यांना अटक केलीय. त्यांना पुणे जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात घेतलं असून पुढील तपासासाठी संगमनेरला आणलं जातंय. पोलिसांनी त्यांच्यासह एकूण ११ जणांविरोधात ४ गुन्हे दाखल केलेत. आता या सगळ्या प्रकरणाचा पोलीस तपास करतीलच. पण अशाप्रकारे वक्तव्य करण्याची देशमुखांची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी अनेकदा अशाप्रकारे थोरात कुटुंबावर हल्ला केलाय. थोरातांच्या तीन पिढ्यांसोबत देशमुखांचा वाद राहिलाय. मागच्या ३५ वर्षांपासून हा संघर्ष सुरू आहे. थोरात विरुद्ध देशमुख ठिणगी कधी पडली होती, याला कारण काय होतं? हा वाद पुढे कसा वाढत गेला? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
[ Ссылка ]
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : [ Ссылка ]
➡️ Twitter : [ Ссылка ]
➡️ Instagram : [ Ссылка ]
➡️Website: [ Ссылка ]
Ещё видео!