जुन्नर तालुक्यातील साकोरी येथील अनिल साळवे या शेतकऱ्यांने आपल्या 5 गुंठे क्षेत्रावर दुधी भोपळ्याची शेती फुलवली आहे. सध्या हे पीक साडेतीन महिन्याचे झाले आहे. यासाठी त्यांनी अडीच हजार रुपये खर्च केला असून .आजअखेर या पिकात त्यांना दहा हजाराचे उत्पादन मिळाले आहे. सेंद्रिय निविष्ठांचा वापर केल्याने पीक जोमदार आल्याचे साळवे यांनी सांगितले.आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला भोपळ्याचे पीक वरदान ठरत आहे. आमचे *ब्युरो चीफ रामदास सांगळे* यांनी अनिल साळवे यांच्याकडून दुधी भोपळ्याच्या यशस्वी शेतीबद्दल जाणून घेतलं आहे.
Ещё видео!