मराठी आणि कोंकणी या दोन्ही भाषेतील लेखनासाठी प्रसिद्ध असलेले कवी बा. भ. बोरकर. त्यांच्या लहानपणीच्या एका प्रसंगानुसार अभंग सादरीकरणाच्या वेळी, अभंग पाठ नसल्यामुळे प्रेक्षकांसमोर ऐनवेळी त्यांनी स्वतः एक अभंग रचून "बाकी म्हणे" असा त्याचा शेवट केला. यातला "बाकी" म्हणजे 'बाकीब' हे त्यांचं लहानपणीचं टोपणनाव. लहानपणीच अख्खा अभंग रचणा-या या कवींचा "प्रतिभा" हा पहिला काव्यसंग्रह वयाच्या अवघ्या वीसाव्या वर्षीच प्रकाशित झाला यात काही नवल नाही. बोरकरांच्या मरणोत्तर काळात पुलं आणि सुनीताबाई देशपांडे यांनी त्यांच्या अनेक कवितांच्या वाचनाचे कार्यक्रम केले. त्यांचीच ही कविता 'लावण्य रेखा'.
सादरीकरण - भैरवी चितळे
संगीत - भैरवी चितळे
पार्श्वसंगीत - मोहित पुरणकर
निर्मिती - निराग स्टुडिओज्
निराग स्टुडिओज्
संपर्क - niragstudios@gmail.com
चॅनल किंवा त्यावरील कवितांसंदर्भात तुमच्या काही सूचना, प्रतिक्रिया किंवा अभिप्राय असतील तर त्या Video खाली Comments मध्ये किंवा थेट आमच्या Email Id वर जरूर कळवा.
Ещё видео!