राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेला देशव्यापी एकदिवसीय संप मागे घेतलाय. हे विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडे पाठविण्यात आल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला. त्यामुळे आता लगेच विधेयक मंजूर होण्याची शक्यता कमी आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकामध्ये ब-याच त्रुटी असल्याचं इंडियन मेडिकल असोसिएशनचं म्हणणं आहे. आणि या विधेयकाला विरोध करत आयएमएनं आज काळा दिवस पाळला... या विधेयकात डॉक्टरांच्या भूमिकेचा व सहभागाचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही, असा आरोप आयएमएने केला आहे. त्यामुळे या विधेयकाला विरोध करण्यासाठी खासगी वैद्यकीय सेवांमधील डॉक्टरांनी १२ तास बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
For latest breaking news, other top stories log on to: [ Ссылка ] & [ Ссылка ]
Ещё видео!