🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
♦️ *खड्डा भरताना कोणती खते टाकावीत ?* ♦️
सिंगल सुपर फोस्फेट - १ Kg
हुमिक ॲसिड- ३०० ते ४०० ग्रॅम
रिजेंट- ५० ग्रॅम
मिथिल पॅरिथिॲन(फंगिसाइड )-
१०० ग्रॅम
लिंबोळी पेंड -१ घमेले (१० किलो )
लेंडी खत -२ घमेली (२० किलो )
शेणखत -६ घमेली (६० किलो )
गांडूळखत -१ घमेले (१० किलो )
पालापाचोळा वाळका थर पाऊण फुट
मायक्रो.(सूक्ष्म अन्नद्रव्य) -५० gr
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*खड्डे कसे काढावेत ? व कसे भरावेत ?*
१) आंबा लागवड ही खड्डे काढून किंवा वाफा/सरी/चर तयार करूनही करता येते.
२)आंबा लागवडीसाठी खड्डे काढताना 3×3×3 फुट ही पध्दत आदर्श मानली जाते.
३)जेसीबीच्या सहाय्याने खड्डे काढल्यास खड्ड्याचे पोट निघत नाहीत म्हणून हे खड्डे ३ फुट अंतराने तासून घ्यावेत.
४)अती मुरमाड व कठीण दगड असणाऱ्या जमीनीत लागवड करने टाळावे .
५) लागवड करावयाची झाल्यास खड्डे थोडे अधिक खोल ४/५ फुटा पर्यंत काढावेत.
६) खड्डे साधारणपणे एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात काढावेत .
७) खड्डे काढून झाल्यावर किमान एक महिना ते/ ४० दिवस कडक उन्हात तापतील याची काळजी घ्यावी.
८) महिन्याभरात खड्ड्यात पडलेली माती काढून खड्ड्याच्या आतील पाच बाजुने बुरशी नाशक व वाळवी नाशक फवारणी करुन घ्यावी.
९)तळाशी कठीण मुरुम असल्यास खड्डे काढल्यानंतर वेळोवेळी खड्ड्यात पाणी ओतावे जेणेकरून तळाशी असणारा मुरुम मउ होइल.
१०) मे चा शेवटचा आठवडा किंवा जून च्या पहिल्या आठवड्यात आंबा रोपांची लागवड/रोपन करावे.
११) खड्डा काढल्यानंतर साधारणपणे एका महिन्यानंतर खड्डे माती +लेंडी खत+शेणखत +गांडूळखत +कंपोस्ट खत +पालापाचोळा+बायो सेंद्रिय खत +लिंबोळी पेंड यांच्या सयुक्त मिश्रणाने
भरावा.
🔸सिंगल सुपर फोस्फेट चा आवश्यक असल्यास वापर करावा मुळांची वाढ चांगली होते.🔸
१२)3×3×3 चा खड्डा भरण्यासाठी साधारणपणे ६५ ते ७० पाटी/घमेली यांचे सयुक्त मिश्रण लागते.
१३)खड्डा भरताना खड्ड्याच्या तळाशी किमान ५ इंचाचा पालापाचोळा/कंपोस्ट चा थर द्यावा.
🔹त्यापूर्वी थायमेट किंवा इतर बुरशी नाशक तळाशी टाकावेत.🔹
१४) खड्ड्याच्या मध्यभागी झाडाला आधार देणारी मानगा/बांबू ची काठी उभी करुनच खड्डा भरावा.
१५) पाण्याची सुविधा उत्तम असल्यास भारतीय उपखंडात मे च्या शेवटी ही लागवड करता येते.
१६) जून च्या पहील्या आठवड्यात मान्सुन चा अंदाज घेउन आंबा रोपांची लागवड करावी.
१७) रोप लावल्या नंतर लगेच त्याला किमान १०/१५ लिटर पाणी झारीच्या साहाय्याने द्यावे .
१८) लावलेल्या रोपास सुतळी किंवा काथ्या चा वापर करुन जमिनीत लावलेल्या काठीला बांधून आधार द्यावा.
१९) रोपाचे कलम केलेली जागा जमीनीत मुजनार नाही याची काळजी घ्यावी.
🔺श्री.ऱाहुल खैरमोडे सर🔻
पाटण(सातारा)
Contact No.
88 55 900 300
88 88 78 22 53 (Whatsapp)
mrkhairmodesirji@gmail.com
Ещё видео!