रस्ता वहिवाट आणि नवीन रस्ता या दोन संकल्पनांमध्ये नेहमीच गफलत केली जाते. तर, रस्ता वहिवाट आणि नवीन रस्ता या संकल्पनेतला फरक समजावून सांगण्याबद्दलचा हा व्हिडिओ.
मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906 कलम 5(2) आणि एम एल आर सी 1966 म्हणजे महा. जमीन महसूल संहिता 1966 या शेतरस्त्यासंदर्भातल्या दोन महत्त्वाच्या तरतुदी आहेत. परंतु यातले बारकावे अर्जदार शेतकऱ्यांना माहिती नसल्याने अनेकदा जो अर्ज मामलेदार न्यायालयाखालच्या तरतुदीनुसार दाखल केला जाणं आवश्यक आहे तो जमीन महसूल संहिता 143 खाली दाखल केला जातो. किंवा 143 खाली दाखल करणे आवश्यक असलेला अर्ज मामलेदार न्यायालयाखाली दाखल केला जातो. शिवाय संपूर्ण चौकशी किंवा सुनावणी पूर्ण झाल्यानंतर या बाबी निदर्शनाला येतात आणि अशा वेळेला झालेली संपूर्ण कार्यवाही कायदेशीर आणि तांत्रिकदृष्ट्या चुकीची असल्याचे निदर्शनाला येतं. आणि आदेश पारित करताना तांत्रिकदृष्ट्या कायद्याचे विसंगत आदेश पारित होतात. हे जर टाळायचं असेल तर अर्ज दाखल करताना च दक्षता घेतली जाणं गरजेचं आहे.
Ещё видео!