*सरदार सूर्याजी काकडे हे शिवाजी महाराजांचे बालसवंगडी होते*
*स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा ज्यावेळी घेतली त्याम्हध्ये सरदार सूर्याजी काकडे सहभागी होते*
*१० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडच्या रणसंग्रामात सरदार सूर्याजी काकडे हे महाराजांच्या १० अगरक्षकांपकी एक होते. ते प्रामुख्याने पुढे होते आणि आणि अफजल खानाच्या अंगरक्षकाला सरदार सूर्याजी काकडे यांनी ठार मारले.या घटनेचा उल्लेख शिवभारत या ग्रँथात आहे. सरदार सुर्याजी काकडे हे पाच ५००० हजारी मनसबदारी सरदार होते.*
*महाराजांनी चंद्रराव मोरे, जावळी यांचा पाडाव करण्यासाठी सरदार सूर्याजी काकडे यांना पाठवले होते. २००० मावळे बरोबर घेऊन सरदार सूर्याजी काकडे यांनी जावळीला वेढा घालून जावळी सर केली.*
*१९ फेब्रुवारी १६७२ मध्ये साल्हेरचे युद्ध झाले या युद्धाच्या रणसंग्रामात सरदार सूर्याजी काकडे धारातीर्थी पडले.सभासद बकरम्हध्ये साहल्हेरच्या युद्धाचे वर्णन आहे. या बखरीमध्ये सरदार सूर्याजी काकडे यांना कर्णाची उपमा दिली आहे*
Ещё видео!