'हे राम नथुराम' या नाटकावरून सध्या महाराष्ट्रभर वाद सुरू आहे. हे नाटक व्हावं की न व्हावं या विषयावर आज सामटीव्हीवरच्या आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात चर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेदरम्यान नथुराम गोडसे यांची भूमिका साकारणारे शरद पोंक्षे यांचाही समावेश होता. ही चर्चा रंगात आलेली होती. त्याचवेळी अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी शरद पोंक्षे यांचा उल्लेख पोपट असा केल्यानं शरद पोंक्षे चांगलेच संतापले आणि चर्चेतून उठून निघून गेले. त्यांनी सामटीव्हीच्या कॅमरेमनला कॅमेराही बंद करण्यास सांगितला. तसंच इअरफोनही काढून टाकला. अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या चर्चेतून शरद पोंक्षे उठून गेले असले तरीही चर्चेत सहभागी झालेल्या सगळ्या मान्यवरांचं मत हेच होतं की नाटक झालं पाहिजे. त्यावर गदा यायला नको.
Ещё видео!