Namaskar, Welcome to BharatAgri.
Download BharatAgri: [ Ссылка ]
For any farming related queries, please chat on BharatAgri App
============================================================
What is Chilet ?
============================================================
🌟प्रश्न - चिलेटेड म्हनजे काय ?
🌟 उत्तर-
1️⃣ चिलेट हा ग्रीक भाषेतील शब्द असून, त्याचा अर्थ पंजा असा होतो.
2️⃣ रासायनिकदृष्ट्या चिलेटस म्हणजे धनभारीत अन्नद्रव्ये उदा. लोह (आयर्न), जस्त (झिंक), मॅंगनीज (मंगल) आणि कॉपर (तांबे) यांच्या सोबत सेंद्रीय पदार्थाचा रासायनिक बंध तयार होवून झालेले संयुग. त्यामध्ये धनभारीत सूक्ष्म अन्नद्रव्य अणू धरून ठेवला जातो आणि पिकांना गुरजेनुसार उपलब्ध स्वरूपात मिळतो.
🔴 चिलेटसचे प्रकार-
👉 (चिलेट्स दोन प्रकारांत आढळतात)
🅰️ कृत्रिमरीत्या तयार केलेले चिलेट्स
🅱️ नैसर्गिकरीत्या तयार झालेले चिलेट्स
🅰️ कृत्रिमरीत्या तयार केलेले -
कृत्रिमरीत्या रासायनिक अभिक्रियेतून तयार केलेले चिलेट्स बाजारात उपलब्ध आहेत.
उदा.
1️⃣ ईडीटीए - ईथिलीन डायअमाईन टेट्रा ऍसिटीक ऍसिड.
2️⃣ एचईडीडीए - हायड्रॉक्सी इथाईल ईथिलीन डायअमाईन टेट्रा ऍसिटिक ऍसिड.
3️⃣ ईडीडीएचए - ईथिलीन डायअमाईन डाय हैडॉक्सी ऍसिटिक ऍसिड.
4️⃣ सीडीटीए - सायक्लोहेनझेन डाय अमाईन टेट्रा ऍसिटिक ऍसिड.
🅱️ नैसर्गिकरीत्या तयार झालेले -
1️⃣ सेंद्रिय पदार्थांच्या विघटनातून तयार झालेली काही सेंद्रिय आम्ले प्रामुख्याने मॅलिक ऍसिड, टायटारिक ऍसिड, सायट्रिक ऍसिड ही थोड्या प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्ये चिलेटिंगचे कार्य करतात. त्यामुळे पुरवठा करण्यात आलेली सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीत स्थिर न होता उपलब्ध स्वरूपात टिकून राहतात.
2️⃣ नैसर्गिकरीत्या तयार सेंद्रिय पदार्थदेखील चिलेट्स स्वरूपात उपलब्ध होतात. उदा. सेंद्रिय खतांचे विघटन होऊन काही सेंद्रिय पदार्थ उदा. ह्युमीक ऍसिड, फलविक ऍसिड आणि विविध प्रकारची सेंद्रिय आम्ले व ऍमिनो ऍसिड्स तयार होतात. हेच सेंद्रिय पदार्थ चिलेट्स म्हणून कार्य करतात व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे अणू धरून ठेवतात. पिकांना ते सहजपणे उपलब्ध होतात, त्यामुळे कुजलेले शेणखत किंवा गांडूळखत किंवा निंबोळी पेंड इत्यादी सेंद्रिय खतांमध्ये मिसळून सल्फेटयुक्त सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केल्यास त्यांची कार्यक्षमता वाढवता येते.
3️⃣ शेतकरी स्वतः नैसर्गिकरीत्या तयार झालेले चिलेट्स शेतावर तयार करू शकतात; ज्यांचा वापर जमिनीद्वारा सहजरीत्या करता येतो. अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय खतांच्या किंवा शेणखतवापरामुळे अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर अनिष्ट परिणाम होत असतो. त्यामुळे पूर्णतः कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचा किंवा शेणखताचा वापर जमिनीत खत म्हणून करावा.
Ещё видео!