छोट्या पडद्यावर नुकतीच सुरू झालेली आणि खूपच कमी वेळात प्रसिद्धी मिळवलेली मालिका म्हणजेच झी मराठी वाहिनीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ'. मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे हे मुख्य भूमिकेत आहेतच. पण यांच्यासोबतच बालकलाकार मायरा वायकुळ देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. प्रार्थना आणि मायरा दोघीही सोशल मिडियावर चांगल्याच सक्रिय असतात. नुकताच प्रार्थनाने तिच्या इन्स्टाग्रामवर मायरा सोबतचा एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये प्रार्थनाने एक विनोदी फिल्टर वापरलाय. या फिल्टरने दोघींचेही डोळे मोठे झालेले पाहायला मिळतात. व्हिडीओमध्ये मायरा प्रार्थनाला ही मी आहे ना असं विचारताना दिसतेय. व्हिडीओत मायरा आणि प्रार्थनाला स्वतःला या फिल्टरमध्ये पाहून खूप फनी वाटतंय आणि दोघीही या व्हिडीओमध्ये क्युट हसतायेत. आई आणि परीचा हा क्युट व्हिडीओ चाहत्यांना खूपच पसंतीस पडला असून चाहत्यांच्या अनेक या व्हिडीओवर येत आहेत.
#Snehal Vo
#MajhiTujhiReshimgath #PrarthanaBehere #MayraVaikul #Lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
[ Ссылка ]
Ещё видео!